एका वर्षात ९९.६८ टक्के रिटर्न; आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलच्या ‘या’ फंडाची दमदार कामगिरी


मुंबई : भांडवली बाजारातील परिस्थितीशी सुसंगत गुंतवणूक केली तर त्याचा चांगला फायदा मिळतो, हे दिसून आले आहे. याचे एक उदाहरण म्हणजे आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड ज्याने एका वर्षात तब्बल ९९.६८ टक्के रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.

किंचित दिलासा ; सात दिवस दरवाढीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला हा निर्णय
आकड्यांमधून दिसून येते की आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल अपॉर्च्युनिटीज फंडाने वैविध्यता असलेल्या बहुतांश इक्विटीजने सर्वाधिक परतावा दिला आहे. म्युच्युअल फंड उद्योगाचा विचार केला तर सर्वोत्तम परतावा देणाऱ्या लार्ज कॅप फंडाचा एका वर्षातील परतावा ६९.१२ टक्के आहे. तर सर्वोत्तम लार्ज अँड मिड कॅपचा परतावा ७९.४० टक्के, बेस्ट मल्टीकॅपचा रिटर्न ७५.८८ टक्के , सर्वोत्तम मिडकॅप फंडांचा परतावा ८५.६९ टक्के आणि ईएलएसएस फंडांचा परतावा ८० टक्के आहे. सर्वोत्तम फोकस फंडाने वर्षभरात ८३.७६ टक्के परतावा दिला आहे.

व्हॅल्यू रिसर्चच्या आडकेवारीनुसार जानेवारी २०१९ मध्ये आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल इंडिया अपॉर्च्युनिटीज फंडात सुरुवातीला १० रुपये गुंतवणूक केली असल्यास आजच्या घडीला त्याचे मूल्य १८.५५ रुपये इतके वाढलेले आहे. तर याच कालावधीत निफ्टी ५०० टीआरआय इंडेक्समध्ये हीच गुंतवणूक केली असल्यास त्यावर ३९.६ टक्के फायदा मिळाला असता. हा फंड ऊर्जा, दूरसंचार, औषध निर्माण, धातू, तेल आणि वायू या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करतो.

‘आकाशी’ झेप घे रे…! एका भेटीनंतर चक्र फिरली, झुनझुनवालांच्या विमान कंपनीला केंद्राचा ग्रीन सिग्नल
मागील एक वर्षात या फंडाने ज्यामध्ये गुंतवणूक केली त्यात टाटा स्टील २६१ टक्के, हिंदाल्को १९७ टक्के, टाटा पॉवर १६१ टक्के, ओएनजीसी १०३ टक्के आणि एअरटेलने ६७ टक्के रिटर्न दिला आहे. ऑगस्ट २०२१ पर्यंत या फंडांचे लार्जकॅपमधील गुंतवणूक प्रमाण ७७.२५ टक्के आहे. मिडकॅपमध्ये ९ टक्के आणि स्मॉलकॅपमध्ये १३.७५ टक्के आहे.

RBIने रेपो दर ठेवले ‘जैसे थे’; अधिक परताव्यासाठी एफडी नाही, तर इथं करा गुंतवणूक
विशेष परिस्थितील फंड म्हणजे हा फंड कधी कधी मार्केट सायकल किंवा काही विशिष्ट कारणांमुळे कंपन्यांपुढे संकटे निर्माण होतात. अशा परिस्थितीत हा फंड गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या संधी निर्माण करतो. आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड सर्वसाधारणपणे भक्कम पाळेमुळे असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. ज्या अशा संकट प्रसंगी अनिश्चित अपयशाचा सामना करत असतात.

आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंडाचे ईडी आणि सीआयओ एस. नरेन हे या फंडाचे व्यवस्थापक आहेत. ते सांगतात की दीर्घ काळात अशा विशेष परिस्थितीत केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळतो. अल्प कालावधीत त्यात चढ उतार दिसून येतात, करोना संकटाने अशा अनेक तात्पुरत्या विशेष संधी उपलब्ध केल्या होत्या. अशा स्थितीत गुंतवणुकीची संधी निर्माण होते. यातील गुंतवणूक संधी या स्पष्टपणे दिसतात आणि समजू शकता. कोणतीही कंपनी, क्षेत्र किंवा अर्थव्यवस्थेतील कोणातही अनिश्चित संकट, सरकारी कारवाई, किंवा नियमांमध्ये सुधारणा तसेच जागतिक घडामोडी यामुळे देखील विशेष परिस्थिती निर्माण होऊ शकते.

अल्ट्रा हाय नेटवर्थ असलेल्या लोकांसाठी काम करणाऱ्या फ्लेक्झी कॅपिटलचे मॅनेजिंग पार्टनर नासिर सलीम यांच्यामते या फंडाने मागील एका वर्षात फार्मा आणि टेलीकॉमसारख्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत जोखीम संतुलित ठेवत चांगला परतावा दिला आहे. सध्याच्या करोनाेसारख्या महामारीमध्ये हे शुभ संकेत आहेत .

माॅर्निंग स्टारचे कौस्तुभ बेलापूरकर यांच्या मते विशेष परिस्थिती म्हणजे ही आहे की कंपन्या मार्केट किंवा इंडस्ट्रीतील निराशाजनक परिस्थितीमुळे संघर्ष करतात मात्र त्यांची पाळेमुळे मजबूत असतात. अशा कंपन्यांचे शेअर त्यावेळी घसरतात मात्र पुढे जाऊन त्यांची कामगिरी उंचावते. ज्यांना ५ ते ७ वर्षांसाठी गुंतवणूक करायची आहे अशांनी स्पेशल सिच्युअएश फंडाबाबत विचार करायला हवा. या श्रेणीतील आघाडीचे नाव म्हणजे आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल स्पेशल सिच्युएशन फंड आहे. जो काही महिन्यांपूर्वी बाजारात दाखल झाला. या फंडाने सर्वोत्तम परतावा दिला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: