केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचे म्हणणे आहे की, काँग्रेसअध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या कडवटपणाचा परिचय देत आपल्या खाजगी आजारपणात पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना अनावश्यकरीत्या ओढले. खरगे म्हणाले की, नरेंद्र मोदींना सत्तेवरून काढल्यानंतरच मी या जगाचा निरोप घेईल.
यावर अमित शाह म्हणाले की, 'जम्मू-कश्मीर मधील रॅलीमध्ये खरगे यांची टिप्पणी हे दाखवत आहे की, काँग्रेसच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी किती तिरस्कार आणि भीती आहे. ते सतत मोदींबद्दलच विचार करतात. जिथे खरगे यांच्या प्रकृतीची बाब आहे तर आम्ही आणि पंतप्रधान मोदीजी ही प्रार्थना करू की, खरगे यांना दिर्घआयुष्य लाभो आणि आणि ते लवकर बरे होवो.
मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-कश्मीरमधील जसरोटामध्ये आयोजित एका रॅलीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची प्रकृती खालावली, पण तरीदेखील त्यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. सत्तेत असलेल्या महायुतीवर निशाणा साधत ते म्हणाले की, ‘जेव्हा आमची सरकार येईल तेव्हा आम्ही आतंकवाद मुळापासून नष्ट करू.' यानंतर ते काही वेळ थांबले.
पंतप्रधान मोदीजींनी रविवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी बोलून त्याच्या आरोग्याविषयी विचारपूरस केली. तसेच मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदींनी काँग्रेस अध्यक्ष यांना फोन केला व विचारपूस करीत त्यांच्या चांगल्या आरोग्यसाठी प्रार्थना केली.
Edited By- Dhanashri Naik
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.