मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा ३ ऑक्टोबरपासून गाव भेट दौरा
मनसे नेते दिलीप धोत्रे साधणार जनतेशी संवाद
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९/०९/२०२४- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांचा ३ ते ६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान मतदार संघात गाव भेट दौरा करणार आहेत.गाव भेट दौरा गुरुवार दि.३ ऑक्टोबर २०२४ पासून दुपारी ३ वाजता पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील ग्रामदैवत सिताराम महाराज यांचे दर्शन घेऊन सुरू होणार आहे.
पुढे सायंकाळी ६ वाजता तपकिरी शेटफळ, रात्री ७ वाजता तनाळी, रात्री ८ वाजता तावशी,
शुक्रवार दि.४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता सिद्धेवाडी, सकाळी ९ वाजता शिरगाव, १० वाजता एकलासपुर, सायंकाळी ५ वाजता अनवली, सहा वाजता रांजणी, ७ वाजता मुंढेवाडी ८ वाजता गोपाळपूर,
शनिवार दिनांक ५ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता उंबरगाव, सकाळी ९ वाजता बोहाळी, १० वाजता कोर्टी, सायंकाळी ५ वाजता टाकळी, ७ वाजता गादेगाव,
रविवार दि.६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता शिरढोण,९ वाजता कवठाळी, सायंकाळी ६ वाजता वाखरी, सायंकाळी ७ वाजता कासेगाव असा दौरा असणार आहे.
यादरम्यान मनसेनेचे दिलीप धोत्रे जनतेशी हितगुज साधून समस्या जाणून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत.
राज्यातील मनसेचे पहिले उमेदवार म्हणून मनसे नेते दिलीप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिलीप धोत्रे यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदार संघातील जनतेशी नाळ जोडली आहे.यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांचे मोठे आवाहन असणार आहे.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.