पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने देशी बनावटी रिव्हॉल्वरसह आरोपीस केले जेरबंद
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अर्जुन भोसले पंढरपूर व शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली दि.२८/०९/२०२४ रोजी ९.४५ वा. चे सुमारास गुन्हे प्रकटीकरण पथकासह पो. ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असता गुप्त बातमीदाराकरवी माहिती प्राप्त झाली की, शहरातील दुध पंढरी समोर इसबावी येथे एक इसम हा त्याचे जवळ देशी बनावटीचे रिव्हॉल्वर बाळगुन फिरत आहे.
सदर बातमीबाबत वरिष्ठांना हकीकत सांगून प्राप्त माहितीची खातरजमा करून कारवाई करणेकामी पथक तात्काळ रवाना केले.सदर ठिकाणी सापळा रचून संशयीत इसम योगेश मारूती खंडागळे वय – २६ वर्ष, रा.खंडाळी, ता. माळशिरस, जि.सोलापूर यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेस एक देशी बनावटीचे रिव्हॉल्वर मिळून आल्याने ते पुढील कारवाई कामी ताब्यात घेतले आणि त्याच्याविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुरनं. ५९४/२०२४ भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५, अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी ही सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी , अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर पंढरपूर विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले पंढरपूर व पंढरपूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि आशिष कांबळे, सपोफौ राजेश गोसावी, सपोफौ / नागनाथ कदम, सपोफौ शरद कदम, पोहेकॉ बिपीनचंद्र ढेरे, पोहेकॉ सुरज हेंबाडे, पोहेकॉ सिरमा गोडसे, पोहेकॉ सचिन, हेंबाडे, पोहेकॉ नवनाथ माने पोहेकॉ नितीन पलुसकर, पोकॉ बजरंग बिचुकले, पोकॉ समाधान माने, पोकॉ शहाजी मंडले, पोकॉ निलेश कांबळे व सायबर विभागाचे पोकॉ योगेश नरळे यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक आशिष कांबळे हे करीत आहेत.
पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोठेही संशयास्पद व्यक्ती अथवा वस्तू आढळून आल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधून माहिती द्यावी त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.