सिरौलीतील कल्याणपूर गावात बुधवारी संध्याकाळी लोकवस्तीच्या परिसरात सुरू असलेल्या एका बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला, ज्यामुळे पाच घरे जमीनदोस्त झाली. या अपघातात आई आणि दोन निष्पाप मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला. याशिवाय सहा जण जखमी झाले आहे. राज्य आपत्ती बचाव पथक (SDRF) रात्री उशिरापर्यंत बचाव कार्यात गुंतले होते.
मिळालेल्या माहितीनुसार सिरौलीच्या कौवा टोला येथील रहिवासी नाजिम आणि नासीर शाह कल्याणपूर गावातील एका घरात परवाना नसताना फटाका बनवण्याचा कारखाना सुरु होता. येथे फटाक्यांची निर्मिती आणि साठवणूक केली जात होती. बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास फटाक्यांमध्ये अचानक मोठा स्फोट झाला, आजूबाजूची पाच घरे जमीनदोस्त झाली. तसेच हा स्फोट एवढा भयंकर होता की, पाच घरांच्या पडझडीसोबतच आजूबाजूच्या घरांच्या भिंतींना आणि धार्मिक स्थळांनाही भेगा पडल्या. खिडक्यांच्या काचाही तुटल्या. आई मुलासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी मृतदेह पोल्स्टमोर्टमसाठी पाठवले आहे. या स्फोटानंतर प्रशासनाने कडक कारवाई केली आहे.
Edited By- Dhanashri Naik
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.