ठाण्यातील चिप्स कंपनीला भीषण आग

[ad_1]

fire
महाराष्ट्रातील ठाण्यातील एका चिप्स कंपनीला बुधवारी भीषण आग लागल्याची बातमी समोर आली आहे.  ठाण्यातील वागळे इस्टेट संकुलातील रामनगर भागात व्यंकट रमण स्पेशालिटी लिमिटेड या चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली.   

 

मिळालेल्या माहितीनुसार, आग इतकी भीषण आहे की त्यामुळे गॅस सिलिंडरचा देखील स्फोट झाला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. व आग विझवण्यासाठी अग्निशमन विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत होते.

 

आग इतकी भीषण झाली आहे की या कंपनीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झोपड्या असल्याने त्यांच्या घरांनाही आग लागण्याची शक्यता होती.

Edited By- Dhanashri Naik 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top