अहिंसा पतसंस्थेकडून सुजाता विरकर यांचा सत्कार

अहिंसा पतसंस्थेकडून सुजाता विरकर यांचा सत्कार

म्हसवड, जि सातारा, दि.12/10/2021 – सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुजाता सूर्यकांत विरकर या शेतकरी कन्येने वन परिक्षेत्र अधिकारी वर्ग ब राजपत्रित अधिकारी या परीक्षेत उज्वल यश संपादन केल्यामुळे म्हसवड ता. माण, जि सातारा येथील अहिंसा पतसंस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

 आजच्या स्पर्धात्मक युगात जो लढेल तोच जिंकेल या उक्तीप्रमाणे जो संघर्ष करेल,परिश्रम करेल तोच जिंकेल असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन व म्हसवड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष नितिन दोशी यांनी केले.

या कार्यक्रमप्रसंगी सत्कार मूर्ती सुजाता विरकर यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करणेत आला.यावेळी ज्ञानवर्धिनी हायस्कुल चे निवृत्त प्राध्यापक श्री सजगाणे सर यांनी आपले विचार मांडताना सुजाता च्या यशामागचा खडतर प्रवास सांगितला व यशस्वी विद्यार्थ्यांना कौतुकाची पहिली थाप कोण देत असेल तर अहिंसा पतसंस्था आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करणे, सत्कार करणे यासाठी सुद्धा अंगी दातृत्व असावे लागते आणि अशा दातृत्वाचे उदाहरण म्हणजे आदरणीय नितिन दोशी हे आहेत असे मत व्यक्त केले.

  लुनेश विरकर सर यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की म्हसवड पंचक्रोशीतील विद्यार्थांना विशेष करून मुलींना खूप मोठी प्रेरणा मिळणार आहे.म्हसवड पंचक्रोशीतील सर्व शाळां मधील यशस्वी विद्यार्थी असतील मार्गदर्शक शिक्षक असतील, सामाजिक कार्यात अग्रेसर व्यक्ती असतील या सर्वांना शाबासकीचा, कौतुकाचा पहिला हात अहिंसा पतसंस्थेचा असतो.

अध्यक्षीय भाषणात बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितिन दोशी म्हणाले की,सुजाता सारख्या हुशार व होतकरू विद्यार्थ्यांचे मिळवलेले यश बघूनच आम्हाला सत्कार करण्याची इच्छा निर्माण होते.सुजाता 10 वीला पहिली आली होती त्यावेळी तिचा सत्कार करताना आम्हाला मोठा सत्कार घेण्याची संधी मिळू दे अशी मागणी केली होती आणि तिने वनपरिक्षेत्र अधिकारी होऊन सत्कार घेण्याची आमची इच्छा पूर्ण केली आहे.

पुढे बोलताना नितिन दोशी म्हणाले की, मुला पेक्षा मुलगी बरी सुजाता प्रकाश देईल घरोघरी. या कार्यक्रम प्रसंगी सूर्यकांत विरकर, माजी नगरसेवक मदने,नामदेव विरकर, मुकादम, संस्थे चे संचालक महावीर व्होरा,विकास गोंजारी, अभिराज गांधी, संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन वाडेकर यांनी केले. हरिदास मासाळ यांनी आभार मानले.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: