जागतिक संधिवात दिन वृद्ध नागरिकांची तपासणी करून साजरा
लायन्स क्लब पंढरपूर तर्फे मातोश्री वृद्धाश्रमातील नागरिकांची तपासणी

पंढरपूर - लायन्स क्लब पंढरपूर च्यावतीने येथील मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्ध नागरिकांची तपासणी करून १२ ऑक्टोबर जागतिक संधिवात दिन साजरा करण्यात आला. डॉ मंदार सोनवणे व डॉ अश्विनी परदेशी यांनी सर्व वृद्ध नागरिकांची तपासणी केली. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे कॅल्शियमची औषधे देण्यात आले.
जागतिक संधिवात दिननिमित्त अस्थीरोगतज्ञ डॉ मंदार सोनवणे यांनी नागरिकांना हाडाची निगा कशी राखावी याबाबत मार्गदर्शन केले .डॉ अश्विनी परदेशी यांनी वयोमानानुसार कशा प्रकारे आपण काम करावे,कशा हालचाली कराव्यात आणि ज्यांना त्रास आहे किंवा ज्यांना कोणताच त्रास नाही अशा नागरिकांनी कोणकोणते व्यायाम नियमित करावेत हे शिकवले. सुरेखाताई कुलकर्णी यांनी प्रात्यक्षिके करून दाखवली .
याप्रसंगी आश्रमातील लोकांच्या मागणीवरून त्यांना एक हिंडालीयमची मोठी कढई अध्यक्ष विवेक परदेशी यांनी भेट दिली. कार्यक्रमाचा समारोप वृद्धांना फळे वाटप करून केला गेला. या कार्यक्रमास लायन्स अध्यक्ष विवेक परदेशी, रा.पा. कटेकर, कैलास करंडे, डॉ मृणाल गांधी, ललिता कोळवले, सुरेखाताई कुलकर्णी, सौ सरिता गुप्ता, सौ सिमा गुप्ता, सौ सुनीता परदेशी आदी उपस्थित होते.

लायन्स क्लब पंढरपूर च्यावतीने आम्ही समाजोपयोगी कार्य करीत असून भविष्यात विविध प्रकारचे उपक्रम राबवून समाजाच्या हिताचे कार्य करणार असल्याचे अध्यक्ष विवेक परदेशी यांनी सांगितले. या कार्यासाठी लायन्स क्लब च्या सर्व सहकार्यांचे सहकार्य लाभत आहे असे आवर्जून सांगितले.