सुशीलकुमार शिंदे यांना पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातून मताधिक्य दिले तेच मताधिक्य यंदाही कायम राहील- भगिरथ भालके

प्रणिती शिंदे याच खासदार म्हणून दिल्लीला जातील – भगीरथ भालके

भगीरथ भालकेंनी दिला मताधिक्याचा शब्द

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/०४/२०२४- दिवंगत नेते पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे चिरंजीव श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी स्टेजवर उपस्थित राहत भालके गटाच्यावतीने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देण्यात आला असल्याचे जाहीर केले.

बुधवारी भगीरथ भालके यांनी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे व आमदार काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी यांची भेट घेतली. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी ते काँग्रेसच्या स्टेजवर दाखल झाले.

यावेळी बोलताना भगिरथ भालके यांनी दिवंगत नेते भारत भालके यांनी मागील तीन निवडणुकांमध्ये काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांना पंढरपूर आणि मंगळवेढा मतदार संघातून मताधिक्य दिले तेच मताधिक्य यंदाही कायम राहील असा शब्द मी देतो आणि येणाऱ्या चार जून रोजी प्रणिती शिंदे या खासदार म्हणून दिल्लीला जातील असा मनोदय व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *