औसा मतदारसंघात भाजपला धक्का; संभाजी पाटील निलंगेकरांच्या कट्टर समर्थकाचा शिवसेनेत प्रवेश


हायलाइट्स:

  • जिल्हा परिषद सदस्य बजरंग जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश
  • उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भगवा घेतला हाती
  • लातूरमध्ये भाजपला मोठा धक्का

लातूर : भाजप नेते आणि माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे कट्टर समर्थक आणि जिल्हा परिषद सदस्य बजरंग जाधव यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. बजरंग जाधव यांच्या सेना प्रवेशामुळे औसा विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत औसा मतदारसंघातून बजरंग जाधव यांना उमेदवारी हवी होती. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. तेव्हापासूनच बजरंग जाधव भाजपवर नाराज होते, त्यामुळेच त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

channi – amit shah : नवा मुद्दा पेटला! केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्णयाने पंजाब, पश्चिम बंगालला झटका

बजरंग जाधव यांना शिवसेना उमेदवारी देणार?

औसा मतदारसंघात भाजपसह काँग्रेसची ताकद मोठी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढल्यास या मतदारसंघात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला जात असल्याने बजरंग जाधव यांना शिवसेनेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. असं झाल्यास या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: