दे दणादण… फक्त ३६ चेंडूत १६० धावांचा पाऊस, २८ चौकार आणि आठ षटकारांसह ठोकले दुसरे द्विशतक


मेलबर्न : क्रिकेट विश्वात आता अजून धडाकेबाज खेळी पाहायला मिळाली. या खेळीत फक्त३६ चेंडूंत १६० धावा फटकावल्याचे पाहायला मिळाले. हा फलंदाज फक्त एवढ्यावर थांबला नाही तर त्याने आपले दुसरे द्विशतकही यावेळी पूर्ण केले.
५० षटकांच्या क्रिकेटमध्येही द्विशतक झळकावणं ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये ट्रॅविस हेड (Travis Head) नावाच्या क्रिकेटपटूने कमाल केली आहे. मार्श कप स्पर्धेत त्याने फक्त १२७ चेंडूंमध्ये २३० धावा केल्या. साउथ ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार ट्रॅविस हेडने २८ चौकार आणि आठ षटकारांचा पाऊस पाडला. यामुळे त्याच्या संघाने ४८ षटकांच्या सामन्यात आठ गडी बाद ३९१ धावांची मोठी धावसंख्या उभारली. ट्रॅविस हेड व्यतिरिक्त जॅक विथरल्डने ९७ धावांची खेळी केली. प्रतिस्पर्धी संघ क्वीन्सलँडच्या सर्वंच गोलंदाजांचा त्याने खरपूस समाचार घेतला. पण भारतीय वंशाचा गुरिंदर संधू सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने १० षटकांत ७३ धावा देऊन चार बळी मिळवले. साउथ ऑस्ट्रेलियाचा डाव पूर्णपणे ट्रॅविस हेडवर अवलंबून होता. त्याच्या व्यतिरिक्त इतर खेळाडू फलंदाजीत फार काही करू शकले नाहीत.

साउथ ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण सलामीवीर अॅलेक्स केरी (१२) चौथ्या षटकात माघारी परतला. त्यानंतर कर्णधार ट्रॅविस हेड फलंदाजीला आला. आणि क्वीन्सलँडच्या गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरला. डावखुरा फलंदाज ट्रॅविस हेडने जॅक विथरल्डसोबत दुसऱ्या विकेटसाठी २४४ धावांची भागीदारी केली. ही जोडी ३६ व्या षटकात गुरिंदर संधूने फोडली. शतकासाठी फक्त तीन धावांची गरज असताना विथरल्ड उस्मान ख्वाजाकडे झेल देऊन परतला. त्याने आठ चौकार आणि तीन षटकार मारले.

दोनदा द्विशतक झळकावणारा तिसरा खेळाडू
हेडने ६५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने षटकार मारून आपले शतक साजरे केले. त्यानंतर त्याने ११४ चेंडूत आपले लिस्ट क्रिकेटमधील द्विशतक पूर्ण केले. ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये दोनदा द्विशतक झळकावणारा अली ब्राउन आणि रोहित शर्मानंतर तो केवळ तिसरा फलंदाज ठरला आहे. शेवटी ट्रॅविस हेड मायकल नेसरच्या ४७ व्या षटकात मार्नस लाबुशेनकडे झेल देऊन माघारी परतला, पण तोपर्यंत त्याच्या संघाने साडे तीनशे धावांचा टप्पा पार केला होता.

साउथ ऑस्ट्रेलिया ४०० धावांचा टप्पा पार करेल असे वाटत होते, पण हे होऊ शकले नाही. अखेरच्या ३६ धावांमध्ये संघाने सहा गडी गमावले. यामुळे संघ आठ विकेटवर ३९१ धावांपर्यंतच पोहोचू शकला.Source link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: