पंढरपूर विधानसभा मतदार संघात नवीन 20 मतदान केंद्रांची वाढ – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

पंढरपूर विधानसभा मतदार संघात नवीन 20 मतदान केंद्रांची वाढ – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

मतदारांनी मतदार यादीत नावे आणि केंद्र तपासून घ्यावीत

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.8 :- 252- पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार नागरिकांना आवाहन करण्यात येते की,भारत निवडणूक आयोगाने दि.01 जुलै या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत केलेला आहे. त्यानुसार मतदान केंद्राच्या नवीन, स्थलांतरीत, नावात बदलाबाबत निर्णय घेण्यात आलेले आहेत.पुर्वी मतदार संघात 337 मतदान केंद्रे होती. यात नवीन 20 वाढीव मतदान केंद्राची भर पडली आहे. त्यानुसार आता 357 मतदान केंद्र तयार झाली आहेत. मतदारांनी आपली नांवे, फोटो, पत्ता व इतर बाबी मतदार यादीमध्ये तपासून घ्याव्यात, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.

निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे म्हणाले की, मतदारांनी आपली नांवे मतदार यादीत आहेत किंवा कसे याबाबत खात्री करुन घ्यावी.18 वर्ष पूर्ण झालेल्या व त्यावरील सर्व नागरिकांनी आपले नांव मतदार यादी फॉर्म 6 भरुन नांव नोंदणी करावी. ज्या मतदान केंद्रावर, एकाच कुटुंबातील मतदार यादीतील नांवे इतर मतदान केंद्रात विखुरलेले असल्यास त्यांनी त्या मतदान केंद्रावर नांवे आणण्यासाठी फॉर्म ८ भरावेत.त्यामध्ये मतदान केंद्रास नव्याने जो अनुक्रमांक देण्यात आलेला आहे, तो अचूक पध्दतीने फॉर्ममध्ये भरण्यात यावा. त्यासाठी वेबसाईटवर प्रसिध्द केलेल्या मतदान केंद्राच्या यादीचा आधार घेण्यात यावा. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या मतदानांदिवशी ज्या मतदारांची नांवे मतदार यादीत आढळून आलेली नाहीत. अथवा वगळलेली गेलेली असल्याने ज्या मतदारांना मतदान करता आले नाही, अशा मतदारांची पडताळणी करण्यात आली आहे. अशा मतदाराकडून फॉर्म नं 6 भरुन घेऊन त्यांची नांवे नव्याने समाविष्ट करण्यात आलेली आहेत.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading