Israel-Lebanon War : इस्रायलने उत्तर लेबनॉनमधील निवासी इमारतींना लक्ष्य केले, 18 जणांचा मृत्यू

[ad_1]

israel hezbollah war
इस्रायलने हिजबुल्लाहकडून सुरू असलेल्या हल्ल्यांना उत्तर देणे सुरूच ठेवले आहे. दरम्यान, इस्रायलने लेबनॉनची राजधानी गाझा येथे हवाई हल्ले आणि जमिनीवरील कारवाईही तीव्र केली आहे. सोमवारी इस्रायली सैन्याने उत्तर लेबनॉनमधील एका अपार्टमेंट इमारतीला लक्ष्य केले. या घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला. निवासी इमारतीत अनेक लोक राहत असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. लेबनीज रेड क्रॉसने ही माहिती दिली.

या घटनेवर इस्रायली लष्कराकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. या हल्ल्यात इस्रायलने कोणाला लक्ष्य केले हेही स्पष्ट झालेले नाही. गाझा पट्टीतील निर्वासितांच्या छावणीवर इस्रायली लष्कराने केलेल्या हल्ल्यात चार जण ठार झाले होते. त्याचवेळी दोन डझनहून अधिक लोक गंभीररीत्या भाजले.

 

यापूर्वी, मध्य गाझामधील शाळेवर इस्रायली सैन्याच्या हवाई हल्ल्यात मुलांसह किमान 20 लोक ठार झाले होते. रविवारी नुसिरतमध्ये झालेल्या हल्ल्यात दोन महिलांचाही मृत्यू झाला. अनेक लोक या शाळेत आसरा घेत होते. 

Edited By – Priya Dixit 

 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top