हरियाणामध्ये नायब सैनी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यावेळस मंचावर पीएम मोदी, शाह आणि नड्डा उपस्थित होते.
तसेच हरियाणात नायब सैनी यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच पंचकुला येथील दसरा मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडत आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. नायब सैनी यांच्यासह भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांनीही अनेक राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली.
मिळालेल्या माहितीनुसार नायब सैनी यांच्यासह 13 मंत्री शपथ घेणार असून यामध्ये अनिल विज, श्याम सिंह राणा, महिपाल धांडा, कृष्ण लाल पनवार, अरविंद शर्मा, रणबीर सिंग गंगवा, आरती राव, श्रुती चौधरी, राव नरबीर सिंग, विपुल गोयल, राजेश नागर गुर्जर, गौरव गौतम आणि कृष्ण कुमार बेदी यांच्या नावांचा सहभाग आहे. सर्व आमदार मंचावर पोहोचले आहे.
Edited By- Dhanashri Naik
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.