मुलांच्या चुकीची शिक्षा आई-वडिलांना मिळणार; ‘या’ देशात होतोय कायदा!


बीजिंग: मुलांनी केलेल्या चुकीची शिक्षा आई-वडिलांना मिळणार आहे. त्यासाठी कायदाच तयार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. चीनमध्ये असा कायदा तयार होत आहे. मुलांनी वाईट वर्तन केल्यास, गुन्हा केल्यास त्यांच्या पालकांना दंड ठोठावण्यात येणार आहे. सध्या या प्रस्तावित कायद्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

कुटुंब शिक्षण प्रोत्साहन कायद्याच्या प्रस्तावित मसुद्यात याबाबत भूमिका मांडण्यात आली आहे. नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या विधेयकांबाबतचे आयोगाचे प्रवक्ते झांग तिइवेई यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलांकडून होत असलेल्या गैरवर्तवणुकीसाठी अनेक कारणे आहेत. त्यामध्ये योग्य प्रकारे कुटुंबाकडून योग्य प्रकारे शिक्षण न मिळण्याचे कारण आहे. मुलांकडून गैरवर्तवणूक होणार नाही, याची काळजी पालकांना घ्यावी लागणार आहे.

बांगलादेशात हिंदूंच्या घरांची जाळपोळ सुरूच; ५२ अटकेत
या कायद्याच्या प्रस्तावित मसुद्यात पालकांना आवाहनही करण्यात आले आहे. आपल्या मुलांना आराम करण्यास, खेळण्यास आणि व्यायाम करण्यासाठी वेळ उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. या मसुद्यावर या आठवड्यात एनपीसीच्या स्थायी समितीत चर्चा होण्याची शक्यता आहे. चीनमध्ये सध्या ऑनलाइन गेमिंग आणि इंटरनेट सेलिब्रेटींचे भक्त होण्याविरोधात सरकारने मोहीम सुरू केली आहे. चीनने ऑनलाइन व्हिडिओ गेमला ‘अध्यात्मिक अफू’ची संज्ञा दिली आहे.

अबब! रेस्टॉरंटमधील जेवणाचे बिल तब्बल ३८ लाख रुपये
चीनमधील शिक्षण मंत्रालयाने लहान मुलांच्या व्हिडिओ गेम खेळण्याच्या तासावर बंधने घालण्यात आली आहेत. या लहान मुलांना शुक्रवार, शनिवार आणि रविवारी फक्त एकच तास ऑनलाइन गेम खेळण्याची परवानगी आहे. त्याशिवाय चीनने लहान मुलांचा गृहपाठ कमी करण्याचे आदेश दिले आहेत. सुट्टीच्या दिवशी शिकवणी घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. लहान मुलांवर अभ्यासाचा ताण वाढत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: