भ.महावीर जन्मकल्याणक निमित्त आ.प्रणिती शिंदे यांनी दिगंबर जैन मंदिरात जाऊन घेतले दर्शन

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त आमदार प्रणिती शिंदे यांनी दिगंबर जैन मंदिरात जाऊन घेतले दर्शन

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज दि.२१/०४/२०२४- सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त रविवारी शहरातील बुबणे जैन मंदिरात जाऊन दर्शन घेतले. अहिंसा या तत्त्वावर जैन धर्माची उभारणी झालेली आहे. जैन धर्माने सर्वांना जगण्याचा अधिकार असल्याचा विचार समाजात रुजवला असल्याची भावना प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली.

भगवान महावीर हे जैन धर्माचे शेवटचे म्हणजेच २४ वे तीर्थंकर असून चैत्र महिन्या तील शुक्लपक्षातील त्रयोदशीला भगवान महावीरांचा जन्म झाला असे मानले जाते. त्याप्रमाणे रविवार २१ एप्रिल रोजी सोलापूर येथे जैन धर्मीयांनी मोठ्या उत्साहात भगवान महावीर जन्मकल्याणक साजरी केली.

यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी बुबणे मंदिरात उपस्थिती लावत दर्शन घेतले.जैन धर्मीयांच्यावतीने काढण्यात आलेल्या रथ यात्रेत सहभागी होऊन सर्वांना जय जिनेंद्र म्हणत महावीर जन्मकल्याणकच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी पराग शाह,राजेंद्र कांसवा,पदम राका,बाहुबली भूमकर,मिलिंद म्हेत्रे,राहुल शाह,मनीष शाह,सुनील सोनिमिंडे, जितेंद्र बलदोटा,नंदकुमार कंगले आदींसह मान्यवर उपस्थित होते.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading