दिवाळी बोनस मिळालाय; पैशांचा योग्य वापर केल्यास मिळतील हे फायदे


हायलाइट्स:

  • वर्षभरातून एकदा मिळालेला बोनस काही लोक खर्च करतात.
  • बहुतेक लोक भेटवस्तू खरेदी करण्यासाठी किंवा सुट्टी साजरी करण्यासाठी त्यांचे बोनसचे पैसे वापरतात.
  • काही ते शहाणपणाने गुंतवतात किंवा विशिष्ट हेतूसाठी बाजूला ठेवतात.

मुंबई : सणासुदीच्या काळात बहुतेक लोक ज्या गोष्टीची वाट पाहतात, ती गोष्ट म्हणजे दिवाळी बोनस. वर्षभरातून एकदा मिळालेला बोनस काही लोक खर्च करतात. बहुतेक लोक भेटवस्तू खरेदी करण्यासाठी किंवा सुट्टी साजरी करण्यासाठी त्यांचे बोनसचे पैसे वापरतात. तर काही ते शहाणपणाने गुंतवतात किंवा विशिष्ट हेतूसाठी बाजूला ठेवतात. जर तुम्ही तुमच्या बोनसचे पैसे हुशारीने वापरत असाल, तर तुम्हाला त्याचा भरपूर फायदाही होतो.

तुम्ही तुमच्या बोनसचा योग्य वापर केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्ही दिवाळी बोनस कसा आणि कुठे वापरू शकता, याबद्दल आपण जाणून घेऊया.

इंधन भडका ; आज पुन्हा महागले पेट्रोल आणि डिझेल, जाणून घ्या आजचा भाव
कर्जाचा बोजा कमी करा
जर तुम्ही पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड लोन किंवा अल्प मुदतीचे कर्ज घेतले आहे, ज्याचे व्याजदर जास्त आहेत, तर तुमचा बोनस वापरण्याचा सर्वात प्रभावी मार्ग ठरेल. कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्ही हा निधी वापरू शकता.

जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल आणि ईएमआय (EMI) चालू ठेवत असाल, तर तुम्ही तुमच्या थकित कर्जाचा काही भाग फेडण्यासाठी बोनसची रक्कम वापरू शकता. कर्जाचा काही भाग भरल्याने तुमचे ओझे कमी होऊ शकते.

महागाईबाबत आरबीआय गंभीर; गव्हर्नर म्हणतात, ‘४ टक्क्यांचं उद्दिष्ट गाठावंच लागेल’
विमा संरक्षण वाढवा
कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे बर्‍याच लोकांना उत्तम आरोग्य विमा संरक्षणाचे महत्त्व समजले आहे. तर काही लोक जास्त प्रीमियममुळे आरोग्य विमा खरेदी करत नाहीत. इतर उच्च प्रीमियम दरांमुळे कमी कव्हरसह सर्वसमावेशक फॅमिली फ्लोटर आरोग्य योजना खरेदी करतात. अशा परिस्थितीत टॉप-अप किंवा सुपर टॉप-अप हेल्थ प्लॅन तुम्हाला अधिक कव्हर मिळवण्यास मदत करू शकतात. तुमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणारे योग्य प्रमाणात विमा संरक्षण आवश्यक आहे.

पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP) मध्ये करा गुंतवणूक
म्युच्युअल फंड योजनांमध्ये नियमित, दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी पद्धतशीर गुंतवणूक योजना (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन – एसआयपी) एक लोकप्रिय रणनीती स्ट्रॅटेजी आहे. एसआयपीसह आपण नियमित अंतराने म्युच्युअल फंड योजनांमध्ये थोड्या प्रमाणात गुंतवणूक करू शकता. एसआयपीमध्ये तुम्ही ५०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. बाजारातील अस्थिरता लक्षात घेता, ज्या गुंतवणूकदारांना धोका पत्करायचा नसतो, त्यांच्यासाठी एसआयपी हा सर्वोत्तम गुंतवणुकीचा पर्याय आहे.

इक्विटीमध्ये एसआयपी सुरू केल्यास दीर्घ मुदतीत चांगला परतावा मिळू शकतो. बोनस म्हणून मिळालेली ही एकरकमी रक्कम वापरण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे डेट फंड मिळवणे आणि नंतर त्याच म्युच्युअल फंड कंपनीसह इक्विटी फंडासाठी एसआयपी सुरू करणे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: