सुदान: लष्कराकडून सत्तापालट, पंतप्रधानांना अटक; तीन ठार, ८० जखमी


कैरो: विद्यमान पंतप्रधानांना अटक केल्यानंतर आणि इंटरनेटसेवा बंद केल्यानंतर काही तासांतच सुदानच्या लष्कराने सोमवारी देशात आणीबाणीची घोषणा केली. देशात लोकशाही मार्गाने सरकार स्थापनेचे प्रयत्न अंतिम टप्प्यात असतानाच लष्कराने बंडखोरी केल्यामुळे जगभरातून चिंता व्यक्त होत आहे. लष्कराने सत्ता हाती घेतल्यानंतर ठिकठिकाणी निदर्शने झाली. आंदोलकांवर झालेल्या गोळीबारात ८० हून अधिकजण जखमी झाले असून तीन ठार झाल्याचे वृत्त आहे.

देशातील सत्ताधारी सार्वभौम परिषद, तसेच पंतप्रधान अब्दल्ला हमदोक यांच्या नेतृत्वाखालील सरकार बरखास्त करत असल्याची घोषणा जनरल अब्देल-फतह बुरहान यांनी दूरचित्रवाणीवरील एका भाषणाद्वारे केली. देशातील राजकीय दुफळीने लष्कराला हस्तक्षेप करण्यास प्रवृत्त केले, असे नमूद करतानाच, लोकशाही मार्गाने सरकारस्थापनेचे वचन त्यांनी दिले. नवीन सरकार सुदानला निवडणुकांकडे नेईल, असे जनरल बुरहान म्हणाले.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजधानी खार्टूम व बाजूच्या ओमदुर्मन शहरात नागरिक लष्कराच्या विरोधात रस्त्यावर उतरले. त्यांनी रस्ते रोखण्यासह अनेक ठिकाणी टायर जाळल्याचे व त्यांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी आश्रूधुराच्या नळकांड्याचा वापर केल्याचे ऑनलाइन शेअर करण्यात आलेल्या चित्रीकरणात दिसत आहे.

Video: ‘या’ विचित्र कारणासाठी भरकार्यक्रमात राज्यपालांच्या कानशिलात लगावली

सत्तापालटाचा विरोध करण्याचे आवाहन

लोकशाही समर्थक असलेला पक्ष सुडनीज प्रोफेशनल एसोसिएशनने लोकांना रस्त्यावर उतरून सत्तापालटाचा विरोध करण्याचे आवाहन केले आहे. लोकांनी रस्त्यावर उतरावे आणि त्याचा ताबा घ्यावा असे आवाहन पक्षाच्यावतीने सोशल मीडियावर करण्यात आले. तर, सुदान कम्युनिस्ट पक्षानेही या सत्तापालटाचा विरोध केला आहे. लष्कराने पूर्ण सत्तापालट केला असल्याचे पक्षाने म्हटले. कामगारांनी-कष्टकरी वर्गाने संपावर जाण्याचे आवाहन कम्युनिस्ट पक्षाने केले आहे. लष्कराने सत्ता हाती घेतल्यानंतर विद्यमान मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, राजकीय नेत्यांना अटक करण्यात आली असल्याचे वृत्त आहे.

तुर्कीचा मोठा निर्णय; अमेरिका, फ्रान्स, जर्मनीच्या राजदूतांवर केली कारवाई

जगभरातून चिंता व्यक्त

दोन वर्षांपूर्वी झालेल्या भव्य निदर्शनांनंतर दीर्घकालीन हुकूमशहा ओमर अल-बशीर याला पदच्युत केल्यापासून लोकशाहीसाठी संघर्ष करणाऱ्या सुदानचा ताबा पुन्हा लष्कराकडे जाणे हा मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे. संयुक्त राष्ट्रांसह अमेरिका आणि अरब लीगने याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: