हुलजंतीतून 4 लाखांचा स्वराज ट्रॅक्टर चोरट्यांनी केला लंपास;अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

हुलजंतीतून 4 लाखांचा स्वराज ट्रॅक्टर चोरट्यांनी केला लंपास; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

शेताजवळ उभा असलेला ट्रॅक्टर रातोरात गायब; मंगळवेढा तालुक्यात ट्रॅक्टर चोरीची खळबळ

हुलजंतीतून 4 लाखांचा स्वराज ट्रॅक्टर चोरट्यांनी केला लंपास; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Mangalwedha crime news: मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावात शेतातील घराजवळ उभा केलेला सुमारे 4 लाख रुपये किंमतीचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शरणाप्पा शिवाप्पा कुंभारी (रा. हुलजंती) यांचा पांढऱ्या रंगाचा स्वराज कंपनीचा 724 मॉडेलचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच-13-ईएक्स- 3466 शेतातील घराजवळ 27 मे रोजी सायंकाळी उभा करण्यात आला होता.दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहिले असता ट्रॅक्टर जागेवर नसल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास आले.अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या संमतीशिवाय आर्थिक फायद्याच्या उद्देशाने ट्रॅक्टर चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

ग्रामीण भागात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांमुळे शेतकरी वर्गात चिंता व्यक्त होत आहे. विशेषतः ट्रॅक्टरसारख्या शेतीसाठी अत्यावश्यक वाहनांच्या चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

या घटनेचा पुढील तपास मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रमोद मोरे करीत असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विविध दिशांनी तपास सुरू आहे.

Leave a Reply

Back To Top