बुलडाण्यात ३ वाहनांचा विचित्र अपघात, ४ जण जागीच ठार तर ७ गंभीर जखमी


बुलडाणा : जिल्ह्यात चिखली-खामगाव मार्गावर वैरागड गावाजवळ आज सकाळी १० वाजताच्या दरम्यान 3 वाहनामध्ये विचित्र अपघात झाला आहे. यात ४ जण जागीच ठार झालेत तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना खामगाव सामान्य रुग्णालयात उपचारा करिता दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात टाटा सुमोचा चुराडा झाला आहे.

वैरागड गावाजवळच्या छोट्या घाटातील वळणावर हा अपघात घडला. दोन मालवाहू बोलेरो सोयाबीनचे पोते घेऊन खामगावकडे जात असताना खामगावकडून चिखलीकडे जाणाऱ्या महावीतरण कंपनीच्या सुमो गाडीला धडकून हा विचित्र अपघात घडला. मोहाडी घाटात बोलेरो- बोलेरो पिकअप व आणि टाटा सुमो या तीन वाहनांचा अपघात झाला.
बापरे! उद्धव ठाकरे घरी असताना कॉम्पलेक्समध्ये होता ८ फूट लांब अजगर, अन्…
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये ४ जण जागीच ठार झाले आहेत. तर ७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: