१४ महिन्याची मुलगी आयुष्याशी झुंज देत असताना शमी देशासाठी लढत होता; ट्रोलर्सना सडतोड उत्तर
ज्या लोकांनी सोशल मीडियावर शमीला ट्रोल केले. ती लोक एक गोष्ट विसरले असतील की, आज ज्याला गद्दर म्हणून ट्रोल केले जात आहे; त्याच्या गोलंदाजीवर हीच लोक टाळ्या वाजवत होतीत. ज्या लोकांनी त्याला ट्रोल केले त्यांना काही गोष्टींची आठवण करून देण्याची गरज आहे.
वाचा-सर्वात घातक पदार्पण; टी-२० वर्ल्डकपमध्ये झाला आजवरचा सर्वात मोठा विक्रम
मुलगी ICU मध्ये आयुष्याशी लढत होती आणि बाब…
ऑक्टोबर २०१६ मधील ही घटना आहे. न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू होता. भारताने ही कसोटी १७८ जिंकली त्याच बरोबर मालिकेत विजय मिळवून आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर कब्जा केला. घरच्या मैदानावर भारताची ही २५०वी कसोटी होती. शमीने दोन्ही डावात प्रत्येकी ३ विकेट मिळून विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. आता ट्रोलर ही गोष्ट विसरून जातात की तेव्हा शमीची मुलगी आयसीयूमध्ये असताना तो मात्र देशासाठी मैदानात खेळत होता. शमीची मुलगी आयरा तेव्हा १४ महिन्यांची होती आणि तिला खुप ताप आला होता. आयराला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ICU मध्ये दाखल करण्यात आले होते.
वाचा-T20 World Cup: पुढच्या सर्व लढती करो वा मरो, टीम इंडियात मोठे बदल; पाहा कोणाला मिळू…
सामना सुरू असताना दुसऱ्या दिवशी त्याला मुलीची तब्येत खराब असल्याचे कळाले. प्रत्येक दिवशी खेळ संपल्यानंतर तो धावत रुग्णालयात जात असे आणि रात्रभर तेथे थांबून पुन्हा दुसऱ्या दिवशी मैदानात देशासाठी खेळण्यास येत होता. ज्या दिवशी सामना संपला त्या दिवशी आयराला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. ही बातमी सामना झाल्यानंतर शमीला कळाली.
पाकिस्तानी चाहत्याला मारण्यास गेला होता शमी
शमी देशासाठी खेळतो आणि त्याचे देशावर प्रेम आहे हे सांगण्यासाठी ट्रोलर्सना आणखी एका गोष्टीची आठवण करून द्यावीशी वाटते. २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला. लंडनच्या ओव्हल मैदानावर सामना झाल्यानंतर भारतीय खेलाडू ड्रेसिंग रूममध्ये येत असताना एक पाकिस्तानी चाहता भारतीय खेळाडूंना पुन्हा पुन्हा बाप कौन है असा प्रश्न विचार होता. भारतीय संघातील अन्य खेळाडूंनी त्याकडे लक्ष दिले नाही. पण मोहम्मद शमीला ही गोष्ट आवडली नाही. तो त्या चाहत्यांच्या अंगावर जात होता. तेव्हा धोनीने त्याला आडवले.
पाकिस्तानविरुद्ध टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा १० विकेटनी पराभव झाला. या सामन्यात शमीने ३.५ षटकात ४३ धावा दिल्या. भारताकडून सर्वात महाग गोलंदाजी त्याची ठरली.