आपले सर्व प्रश्न प्राधान्याने प्रामाणिकपणे सोडविण्यास प्रयत्नशील राहणार – धैर्यशील मोहिते पाटील

तुमची लढाई ही अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठीच आहे

आपले सर्व प्रश्न प्राधान्याने प्रामाणिकपणे सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार – धैर्यशील मोहिते पाटील

माण जि.सातारा /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.25/04/2024- आज माण तालुक्यातील मलवडी या गावाला लोकसभेच्या प्रचारानिमित्त माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट दिली. यावेळी गावातील लोकांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुख्य अडचणी सांगितल्या.

या विभागातील ३२ गावांचा पाणी प्रश्न आहे. त्यावर आपल्याला विधायक काम करून तो प्रश्न पूर्णत्वाकडे घेऊन जायचा आहे.विजय दादा यांच्या काळातील झालेल्या विकास कामाची माहिती लोकांना सांगत आपले सर्व प्रश्न प्राधान्याने प्रामाणिकपणे सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख,सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन अनिल देसाई,अभयसिंह जगताप,महिला प्रदेशाध्यक्ष कविता म्हेत्रे,माजी जि.प. अध्यक्ष सुभाष नरळे, शिवसेना उद्धव ठाकरे जिल्हाध्यक्ष संजय भोसले,माजी जि.प. सदस्य दिलीप तुपे, माजी जि.प. सदस्य बाबासाहेब पवार, माजी सभापती श्रीराम पाटील, मोहन देशमुख, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष एम.के. भोसले,काँग्रेस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने,माने ताई, शिवाजीराव यादव, सरपंच सौ.दिपाली जगदाळे, उपसरपंच सतीश महाजन, जगदीश मगर, स्वाती सावंत, रफिक मुलाणी, रमेश शिंदे, नागेश बर्गे, परकंदी गावचे सरपंच रघुनाथ माने, शिवसेना विभाग प्रमुख सुभाष काटकर,महादेव इंगळे तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *