युवा चौपाल संवाद कार्यक्रम प्रसंगी युवकांचा मोठा उत्साह

युवा मोर्चा आहे तयार, पुन्हा एकदा मोदी सरकार

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25/04/2024- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दक्षिण सोलापूरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नमो युवा चौपाल संवाद कार्यक्रमाला उपस्थित राहत युवकांशी सोलापूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी संवाद साधला.दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या युवा चौपाल संवाद कार्यक्रमाप्रसंगी युवकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला.

यादरम्यान दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष बापू देशमुख यांनी संबोधित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये तरुणांसाठी राबविण्यात आलेल्या अनेक यशस्वी योजनांची माहिती दिली. शिवाय मोदी सरकारची कामगिरी, देशाला मोदी सरकारची गरज का आहे ? यावर संवाद साधत राज्य सरकारने घेतलेले निर्णय मतदारांपर्यंत पोहोचवावे,असे आवाहन केले.

पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून जोमाने काम करू आणि सोलापूरच्या विकासासाठी हातभार लावू असा संकल्प यानिमित्ताने उपस्थित युवकांनी केला.

देशाच्या विकासासाठी व सुरक्षेसाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची पुन्हा एकदा गरज असून यासाठी सोलापूरमधून मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी उपस्थितांशी संवाद साधताना केले.

याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा राष्ट्रीय महामंत्री रोहित चहल,अमोल काळे, श्रीनिवास तसेच युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ता बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *