आपल्याला यावेळी शेतकरी विरोधी सरकारला धडा शिकवायचाय आपण काँग्रेसला भरभरून मतदान करा- प्रणिती शिंदे

ग्रामीण भागात महाविकास आघाडीला मिळणारा प्रतिसाद भारावून टाकणारा


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज दि.25/04/2024- अक्कलकोट तालुक्यातील गाव भेट दौऱ्यात शिंदखेडे गावाला भेट दिली. यावेळी गावकऱ्यांनी उत्साहात स्वागत केले. आपण आपल्या भागातील सोडवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणार, आपल्याला यावेळी शेतकरी विरोधी सरकारला धडा शिकवायचा आहे. आपण काँग्रेसला भरभरून मतदान करा, असे आवाहन या प्रसंगी केलं. ग्रामीण भागात महाविकास आघाडीला मिळणारा प्रतिसाद भारावून टाकणारा आहे. मतदारांचा भक्कम पाठिंबा आणि विश्वास असल्याने विजय साकार होईल, याबाबत शंकाच नाही. याप्रसंगी‌ अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, सिद्धार्थ गायकवाड, व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अक्कलकोट तालुक्याचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी काँग्रेसला संधी द्या-प्रणिती शिंदे

अक्कलकोट तालुक्याच्या गाव भेट दौऱ्यात हसापुर गावाला भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी केलेले स्वागत पाहून आनंद झाला. भाजपचे मागील दोन्ही खासदार विकासकामे करण्यात अपयशी ठरले. अक्कलकोट तालुक्याचा पाणीप्रश्न कायम आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी काँग्रेसला संधी द्या असे आवाहन यावेळी बोलतांना केलं. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रेसह महाविकास आघाडीतील पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

या वेळेस भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेसला मतदान करावे – प्रणिती शिंदे

गाव भेट दौऱ्यात दोड्याळ गावाला भेट दिली. गावकऱ्यांकडून उत्साहात स्वागत आले. भाजप सरकारच्या, अनागोंदी कारभारामुळे सोलापूर विकासापासून कसे वंचित राहिले, याबद्दल समजून सांगितले. या वेळेस भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेसला मतदान करावे, असे आवाहन देखिल यावेळी बोलताना केले. मतदारसंघातून महाविकास आघाडीला भरभरून प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे. यावरून यंदा बदल होणार, महाविकास आघाडी जिंकणार याची खात्री पटते. यावेळी सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह महाविकास आघाडीतील पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading