शिर्डी येथील राज्यस्तरीय काव्यगंध कविसंमेलनात शांताराम गाजरे यांचे काव्यगायन…

शिर्डी येथील राज्यस्तरीय काव्यगंध कविसंमेलनात शांताराम गाजरे यांचे काव्यगायन…

शेळवे/संभाजी वाघुले – रविवार रोजी शिर्डी येथे भारतीय सांस्कृतिक मंच आयोजित राज्यस्तरीय कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.या कवि संमेलनात पंढरपूर येथील कवी शांताराम गाजरे यांचे काव्यगायन झाले.

असशी तू दूर जरी …ही अप्रतिम कविता शांताराम गाजरे सर यांनी सादर केली.
राज्यातून आणि परराज्यांतून आलेले रसिक मंत्रमुग्ध झाले होते.

कविता,ललित लेखन,विविध स्पर्धा यामध्ये सातत्याने यश संपादन करणारे शांताराम गाजरे सर सर्वच क्षेत्रात वावर असलेले व्यासंगी व्यक्तिमत्व असून त्यांचा स्नेहपरिवार खूप मोठा आहे.यापुर्वी ही अनेक वर्तमान पत्रात आणि दिवाळी अंकात त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.

शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन म्हणून काम करताना त्यांनी विविध पदांवर कार्यरत राहून न्याय दिला आहे.

या यशाबद्दल शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख , माध्यमिक महारुद्र नाळे, सुलभा वटारे, गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे, केंद्रप्रमुख शारदा रासकर यांनी अभिनंदन केले आहे.

राज्य शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब काळे चेअरमन उत्तम जमदाडे ,जिल्हा अध्यक्ष रामभाऊ यादव , शिक्षक नेते अण्णासाहेब पवार , रसिक वाचक ग्रुपचे जोतीराम बोंगे ,गावचे सरपंच अनिल गाजरे,उपसरपंच किरण गाजरे, पत्रकार आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी वाघुले यांनी शांताराम गाजरे सरांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Back To Top