विराट आणि रोहितला बसला आणखी एक झटका; पाहा पाकिस्तानच्या खेळाडूंनी काय केले


अबुधाबी: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघातील दोन मोठ्या खेळाडूंना धक्का बसला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्या नावावर असलेले दोन मोठे विक्रम पाकिस्तानच्या खेळाडूंनी स्वत:च्या नावावर केले आहेत. काल मंगळवारी नामिबियाविरुद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तानने ४५ धावांनी विजय मिळवला आणि सेमीफायनलमधील स्थान निश्चित केले.

वाचा- हार्दिक, भुवीला डच्चू; विराटबाबत BCCI दोन दिवसा घेणार मोठा निर्णय

पाकिस्तानच्या या विजयात दोन विक्रम झाले. कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पाचव्यांदा शतकी भागिदारी केली. त्यांनी नामिबियाविरुद्ध ११३ धावांची भागिदारी केली. पाच शतकी भागिदारी करणारे ही जगातील पहिली जोडी ठरली आहे. या दोघांनी भारताच्या शिखर धवन आणि रोहित शर्मा यांना मागे टाकले. शिखर आणि रोहित त्यांनी चार वेळा अशी कामगिरी केली होती.

वाचा- भारतीय संघाची आजपासून सन्मानाची लढाई; अफगाणिस्तानविरुद्ध हवा मोठा..

नामिबियाविरुद्ध बाबरने ४९ चेंडूत ७ चौकारांसह ७० धावा केल्या. बाबरच्या या खेळीत एका विक्रमाची नोंद झाली. त्याने कर्णधार म्हणून १४व्यांदा ५० हून अधिक धावा केल्या. यासह त्याने भारताचा कर्णधार विराट कोहली याला मागे टाकले. विराटने १३ वेळा अशी कामगिरी केली आहे. बाबरने टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. पण विराटला अद्याप शतकाची प्रतिक्षा आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये त्याने ४ पैकी ३ सामन्यात अर्धशतक केली आहेत.

वाचा- असे काय झाले की पाकिस्तानचे खेळाडू नामिबिया संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये गेले; पाहा Video

बाबर आझमने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २ हजार ४०० धावा केल्या. अशी कामगिरी करणारा तो आठवा फलंदाज ठरला. त्याने ६० डावात २ हजार ४०२ धावा केल्या. यात १ शतक आणि २३ अर्धशतक आहेत. धावांच्या बाबत त्याने शोएब मलिक आणि डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले.

भारतीय संघाची आज बुधवारी अफगाणिस्तानविरुद्ध लढत होणार आहे. पहिल्या दोन लढती गमावल्यामुळे भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचणे जवळ जवळ अशक्य आहे. जर ७ नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला तर भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची संधी आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: