जुनी वाहने खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी काय कराल? पोलिसांनी दिल्या सूचना


हायलाइट्स:

  • बनावट कागदपत्रे तयार करुन जुन्या वाहनांची विक्री
  • फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?
  • नवी मुंबई पोलिसांनी दिल्या विशेष सूचना

मनोज जालनावाला | नवी मुंबई :

बनावट कागदपत्रे तयार करुन जुनी वाहने विकली जात असल्याचं तपासात आढळून आलं आहे. चोरीच्या कारवर अपघातग्रस्त वाहनांचे चेसीस नंबर व इंजिन नंबर टाकून अशी कागदपत्रे तयार केली जातात. त्यामुळे नागरिकांनी जुनी कार खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत नवी मुंबई पोलिसांनी विशेष सूचना केल्या आहेत.

जुनी वाहने विकत घेणाऱ्या ग्राहकांनी गाडीचा रंग, मॉडेल नंबर, मॅन्युफॅक्चरिंग वर्ष, इंधन प्रकार रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाच्या वाहन या वेबसाईटवर ऑनलाईन तपासावे. त्यात फरक आढळून आल्यास अधिकृत अधिकारी, डिलरकडून खात्री करुनच वाहन खरेदी करावी. गाडी विकत घेण्यापूर्वी गाडीच्या मूळ मालकाशी संपर्क साधावा. विकत घेणारे वाहन अपघातामध्ये पूर्णपणे नुकसान होऊन मूळ मालकाने इन्शुरन्स कंपनीकडून इन्शुरन्स घेतल्याबाबत खात्री करावी. तसंच विकत घेण्यात येणाऱ्या गाडीचे इंजिन नंबर आणि चेसीस नंबर अपघातातील पूर्णपणे नुकसान झालेल्या वाहनाचा नसल्याची खात्री करावी. त्यात काही तफावत आढळून आल्यास सदर वाहन चोरीचं असल्याचं समजून सदरचं वाहन खरेदी करु नये. तसेच त्याबाबतची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

मुंबईतील तरुणाने करोनात नोकरी गमावली आणि नंतरही झाला मोठा घात!

चोरीच्या वाहनावरील मूळ इंजिन नंबर, चेसीस नंबर छेडछाड करुन त्यावर दुसऱ्या वाहनाचे इंजिन नंबर, चेसीस नंबर प्रिंट केले जात असल्यामुळे ते अनियमित व खरबरीत दिसतात. त्यामुळे सदरचे नंबर अधिकृत अधिकारी, डिलरकडून तपासून घ्यावे, तसंच अशा कारचे सर्व्हिस सेंटरमधून इंजिन नियंत्रण मॉड्युल किंवा इंजिन नियंत्रण युनिट तपासून घ्यावे. त्यानंतर मूळ वाहन मालकाशी संपर्क साधून त्याच्याकडून खात्री झाल्यानंतर सदर वाहनाची खरेदी करावी, अशा सूचना नवी मुंबई पोलिसांनी केल्या आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: