‘सेना आणि सरकार माझ्यासोबत आहे’; शोएब अख्तरला नाही १० कोटीच्या नोटीसची भीती


इस्लामाबाद : एकीकडे पाकिस्तान क्रिकेट संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याने कौतुक होत आहे. तर दुसरीकडे त्यांचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आपल्या वर्तणुकीमुळे चर्चेत आहे. टीव्ही शो अँकर नोमान नियाजने पीटीव्ही शोमध्ये अख्तरसोबत गैरवर्तन केले होते आणि त्यामुळेच अख्तरने शोच्या मध्येच चॅनलचा राजीनामा दिला होता. त्यानंतर चॅनलने अख्तरला १० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठविली होती. या पार्श्वभूमीवर अख्तरने एक मोठे वक्तव्य केले आहे. लष्कर आणि सरकारसह संपूर्ण देश त्याच्यासोबत असल्याचे अख्तरने म्हटले आहे.

वाचा- Video: तुम्ही देखील बघा, अशी आपली धुलाई केली होती

एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना अख्तर म्हणाला की, “पीटीआय (पाकिस्तानचा राजकीय पक्ष) चा पाठिंबा माझ्यासोबत आहे. सर्व राजकीय पक्ष माझ्यासोबत आहेत. लष्करही माझ्यासोबत आहे. सरकारही माझ्यासोबत आहे. आपल्या राष्ट्रीय नायकाच्या बाबतीत असे घडायला नको होते, अशी जनतेची भावना आहे, पण या लोकांनी हे प्रकरण दुसरीकडे नेले आहे. संपूर्ण मंत्रिमंडळ माझ्यासोबत आहे. पंतप्रधान माझ्यासोबत आहेत. सर्वजण माझ्यासोबत आहेत. जर मी तुम्हाला टीव्हीवर काहीही बोलत नसेल, तर याचा अर्थ असा नाही की, तुम्हाला जे वाटेल, ते बोला. आम्ही पीटीव्ही (PTV) ला चोख प्रत्युत्तर देऊ.”

वाचा- ‘संघात दोन ग्रुप; एक दिल्ली तर दुसरा मुंबई, विराट कोहली टी-२०तून निवृत्ती घेणार’

नेमकं काय घडलं?
पीटीव्हीच्या ‘गेम ऑन है’ या शोमध्ये अँकर नियाज आणि अख्तर यांच्यात बाचाबाची झाली होती. अख्तर आपल्या देशातील माजी क्रिकेटपटू आणि व्हिव्हियन रिचर्ड्ससह पीटीव्ही शोमध्ये सहभागी झाला होता. या शोमधील चर्चेदरम्यान अख्तरने शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफ या पाकिस्तानी गोलंदाजांचे कौतुक केले. हे दोघेही पाकिस्तान सुपर लीगच्या लाहोर कलंदर्स संघातून आले आहेत. या दरम्यान शोचा होस्ट नियाजने अख्तरला रोखत म्हटले की, “शाहीन पाकिस्तानच्या अंडर-१९ संघासाठी खेळला आहे.” त्यावेळी अख्तर म्हणाला की, ‘मी हॅरिस रौफबद्दल बोलत आहे.’ अख्तरचे हे बोलणे नियाजला आवडले नाही आणि त्याने अख्तरला फटकारले, नियाज म्हणाला, “तुम्ही जरा उद्धटपणे बोलत आहात. जर तुम्हाला ओव्हरस्मार्ट व्हायचे असेल, तर तुम्ही हा शो सोडू शकता. हे मी तुम्हाला ऑन एअर सांगत आहे.”Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: