पदाेन्नतीमधील आरक्षण रद्दचा निर्णय मागे घेण्याची मागणी

पदाेन्नतीमधील आरक्षण रद्दचा निर्णय मागे घेण्याची मागणी Demand for reversal of decision to cancel reservation in promotion
  साेलापूर,28/05/2021 - राज्यातील सर्व मागासवर्गीय कर्मचा-यांचे पदाेन्नतीमधील ३३ टक्के आरक्षण रद्द करण्याचा राज्य सरकारचा ७ मे २०२१ चा आदेश मागे घ्यावा अशी मागणी समस्त कक्कय्या समाज महासंघातर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे . पदाेन्नतीमधील आरक्षण रद्द करणारा निर्णय असंवैधानिक असून तो तात्काळ रद्द करावा. सर्वाेच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिका मधील निर्णयाच्या अधिन राहून मागासवर्गीयांच्या काेट्यातील पदाेन्नतीची ३३ टक्के पदे बिंदु नामावलीनुसार त्वरीत भरण्यात यावीत आणि  मागासवर्गीयावरील अन्याय दुर करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे .

    शुक्रवारी दुपारी प्रभारी अप्पर तहसीलदार संदीप लटके यांच्याकडे महासंघाचे साेलापूर जिल्हाध्यक्ष शांताराम शिंदे यांनी निवेदन सादर केले.यावेळी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष सटवाजी हाेटकर,महासंघाचे सचिव मनाेज व्हटकर,राज्य कार्यकारिणी सदस्य तिपण्णा इंगळे,जिल्हा पदाधिकारी शशीकांत सदाफुले, आनंद हाेटकर आदी उपस्थित हाेते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: