चुकीच्या पद्धतीने काम झाल्यास आमदार म्हणून नागरिकांच्याच बाजूने राहणार असल्याचाही दिला विश्वास..
पंढरपूरातील कॅरीडोर प्रकरणी नागरिकांमध्ये गैरसमज न पसरवण्याचे आवाहन आ.समाधान आवताडे यांनी केले..
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/०३/२०२५- पंढरपूर शहराच्या विकासासाठी सरकारने कॅरीडॉर राबविण्याचा विचार पक्का केला आहे.माञ यासाठी पंढरपूर येथील नागरिकांची मते जाणून घेणे हे माझे पहिले कर्तव्य आहे त्यासाठी आपण ही बैठक आयोजित केली आहे.त्यामुळे शासन दरबारी नेमकी माझी भूमिका काय असावी ही दाखविण्याची वेळ आल्यास आपण चुकीच्या पद्धतीने होणारे काम व कोणावरही अन्याय होत असेल तर मी आमदार म्हणून नागरिकांच्या पाठीशीच उभा राहीन असे आश्वासन आमदार समाधान आवताडे यांनी दिले आहे.

पंढरपूर येथील कॅरीडॉरबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी शासकीय विश्राम येथे गुरुवारी बैठक बोलावली होती.या बैठकीला पंढरपूर शहर आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील रहिवासी नागरिक आणि व्यापारी यांना निमंत्रित केले होते.गेल्या काही वर्षांपासून पंढरपूर कॅरीडॉर विषय चर्चेत असून मंदिर परिसरातील बाधित लोकांनी विरोध दर्शवला होता तर पंढरपुरातील काहीजण कॅरीडॉरचे समर्थनदेखील करत आहेत.यावर या बैठकीत साधक बाधक चर्चा झाली.नागरिक आणि व्यापाऱ्यांनी आपापली मते या बैठकीत नोंदवली.

त्यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी कॅरीडॉरबाबत प्रशासनाकडून अजून कोणताही आराखडा आलेला नाही.परंतु सभागृहात जर हा विषय चर्चेला आला तर लोकांचे मत काय आहे हे लोकप्रतिनिधी म्हणून मला माहित असावे यासाठी ही बैठक घेतली असून जे इथल्या लोकांचे मत आहे तेच माझेदेखील मत आहे. परंतु कॅरीडॉरला विरोध आहे असा याचा अर्थ नाही तर ते करताना कोणालाही त्रास होणार नाही कोणाचेही नुकसान होणार नाही अशा पद्धतीने करणे गरजेचे आहे असे सांगितले. त्याचबरोबर पंढरपूरकरांचा कॅरीडॉरला संपूर्ण विरोध आहे असेही सातत्याने प्रसारमाध्यमां नी म्हणू नये.केवळ काहीं भागांतील नुकसान होत असल्याने त्या भागाचा योग्य पध्दतीने विचार करू.माञ याचा अर्थ येथील कॅरीडोर प्रकल्पालाच पूर्णतः विरोध असल्याचे बनवू नये असेही आ.समाधान आवताडे म्हणाले.विकासात्मक कोणत्याही गोष्टींना विरोध न करण्याचेही आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले.
वास्तविक पंढरपूरकरांचा कॅरीडॉरला का विरोध आहे हे पाहणे गरजेचे आहे.विकास कामे होत असताना काही गोष्टींना विरोध हा होत असतो मात्र नागरिकांना किंवा स्थानिकांना काही शंका असतील तर त्याच निराकरण योग्य पध्दतीने झाले तर विरोध मावळतो.पंढरपूर कॅरीडॉरला पंढरपूरकरांचा विरोध कशासाठी आहे हे पाहणे गरजेचे आहे कारण अपुरी माहिती विरोधाला कारण ठरते तर काही वेळा राजकीय किंवा वैयक्तिक कारणेही असू शकतात.या आराखड्याबाबत संबंधित विभागाकडून व्यवस्थित सांगितली जाते सर्वांना अपेक्षित आहे कारण प्रत्येकाच्या त्या त्या वास्तूशी,भागाशी भावना निगडीत असतात.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.