धाराशिव येथे शिवसेना महिला आघाडीतर्फे दुर्गाशक्ती महिला सन्मान मेळावा
उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे हस्ते लाडक्या बहिणींचा सन्मान
धाराशिव येथे महिला बचत गट सक्षमीकरणासाठी वास्तुसाठी ना.नीलम गोऱ्हेंचा पंचवीस लाखांचा आमदार निधी जाहिर
धाराशिव/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३/०४/२०२५-धाराशिव येथे आज दुर्गाशक्ती महिला सन्मान मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात सोलापूर जिल्हा,धाराशिव,लातूरसह इतर तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या.यावेळी विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी महिलांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांची माहिती देत त्यांचे मार्गदर्शन केले. शिवसेना जिल्हा प्रमुख सुरज साळुंखे,वरिष्ठ पदाधिकारी शुभांगी नांदगावकर व संगीता चव्हाण,धाराशिव संपर्क प्रमुख यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

महिला सशक्तीकरणासाठी आर्थिक स्वावलंबन अत्यंत महत्त्वाचे असून त्यासाठी महिला बचत गटांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी ठोस प्रयत्न करण्यात येणार असून महिला बचत गटांमार्फत तयार होणाऱ्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

महिला सबलीकरणासाठी समाज आणि शासन यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. महिलांनी शिक्षण,व्यवसाय आणि सामाजिक कार्यामध्ये पुढे येण्याची गरज असून त्यासाठी शासनाने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महिलांनी या संधींचा फायदा घ्यावा आणि आपली स्वतःची ओळख निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात २० महिलांचा डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भारती गायकवाड महिला जिल्हा प्रमुख, अशोक पटवर्धन शिवसेना विभागीय सचिव, किरणताई निंबाळकर जिल्हा संघटक, लातुर महिला संपर्क प्रमुख रंजना कुलकर्णी, माया चव्हाण तालुकाप्रमुख, कविता साळुंखे शिवसेना कार्यकर्ता, कांता शिंदे धाराशिव तालुकाध्यक्ष, आचल जांगित युवती सेना सदस्य,राजश्री माने धाराशिव उपजिल्हा प्रमुख,अर्चना दराडे जिल्हा प्रमुख धाराशिव, पूजा उकरंडे उपजिल्हाप्रमुख धाराशिव,वर्षा मोरे संपर्कप्रमुख गडचिरोली, ॲड.आकांक्षा चौगुले मराठवाडा युवती सेना पदाधिकारी हे सर्व प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते

Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.