पोलिसांनी अमली पदार्थ तस्कर एरिक बटिस्टा कोस्टा याचा केला एन्काउंटर

पोलिसांनी चकमकीत अमली पदार्थ तस्कर एरिक बटिस्टा कोस्टा याला केले ठार Police kill drug smuggler Eric Batista Costa in an encounter

मनास,ब्राझील- शनिवारी पोलिसांनी चकमकीत अमली पदार्थ तस्कर एरिक बटिस्टा कोस्टा याला ठार केले.त्यामुळे अ‍ॅमेझॉनस राज्याची राजधानी मनौसमध्ये स्मशान शांतता पसरली आहे.

      ब्राझीलमधील ड्रग माफियांच्या रोषामुळे मनौस शहर ठप्प झाले आहे. शाळा बंद करावी लागली. एवढेच नव्हे तर माफियांनी बर्‍याच इमारती, बँका आणि वाहनेही जाळली.

 शनिवारी पोलिसांनी चकमकीत मादक तस्कर एरिक बटिस्टा कोस्टा याला ठार केले.तो 'दादिन्हो' म्हणून कुख्यात होता. तुरुंगात असलेल्या त्याच्या टोळीतील साथीदारांना जेव्हा चकमकीची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी त्यांच्या गुंडांना पोलिसांवर हल्ला करण्याचे आदेश दिले जेणेकरून या चकमकीला योग्य असे उत्तर दिले जाऊ शकेल.

   यानंतर मनौसमध्ये माफियांची दहशत सुरू झाली. मोठ्या संख्येने शस्त्रे घेऊन बाहेर पडलेल्या हल्लेखोरांनी बसस्थानक आणि बँकांवर पेट्रोल बॉम्ब फेकले आणि टायरही जाळले. त्यांच्या भीतीमुळे बाजारपेठही बंद झाली. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार अमली पदार्थ तस्करांनी डझनभर बस, सार्वजनिक इमारती, बँका आणि खासगी वाहनांना लक्ष्य केले.एकूण 21 वाहने जाळली गेली आहेत.हिंसाचारामुळे शहरात लसीकरण केंद्रेही बंद करावी लागली आहेत.यामुळे कोरोना लसीकरणही थांबले आहे.

     मनौस पोलिस स्टेशनच्या प्रवेशद्वारावर माफियांनी गोळीबार केला. हँडग्रेनेडही फेकले गेले परंतु ते फुटले नाहीत.या हिंसाचाराच्या प्रकरणी आतापर्यंत  29 जणांना अटक करण्यात आली आहे.राज्यपाल विल्सन लिमा यांनी केंद्र सरकारला माफियांविरुद्ध कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय गार्ड तैनात करण्यास सांगितले आहे.
सोशल मीडियावरही धमक्या,लोक घरातच बंधक आहेत

माफियांच्या दहशतीमुळे आपली घरे सोडता येत नाहीत, असे मनौसमधील लोकांचे म्हणणे आहे. त्यांना असे वाटते की माफियांनी त्यांना ओलिस ठेवले आहे. त्यांनी म्हटले आहे की माफिया बाहेर पडणाऱ्या नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून धमक्या दिल्या जात आहेत.यामुळे नागरिकांना बाहेर पडण्याची भीती वाटते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: