भाजपचा पराभव यामागे नेमकं कारण आणि कोणाची चूक याबाबत राजनीति तज्ञ प्रशांत किशोर काय म्हणाले

पण जिथे उमेदवार न पाहता कोणालाही तिकीट दिले गेले तिथेच पराभवाचा धक्का बसला

नवी दिल्ली – लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांना स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडाही गाठता आलेला नाही.अनेक केंद्रीय मंत्र्यांसहित महत्त्वाचे नेते या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत.

यामागे नेमकं कारण आणि कोणाची चूक याबाबत राजनीति तज्ञ प्रशांत किशोर यांनी सांगितल आहे की लोकसभा निवडणुकीत भाजपला हा आकडा गाठताना न आल्याने एनडीए मधील घटक पक्षांसोबत सरकार स्थापन करावे लागणार आहे. हा झटका का लागला ? याला जबाबदार कोण ? याबाबत सांगताना ते म्हणाले की आम्ही नक्कीच जिंकू हा अतिविश्वास भाजपला नडला. भाजपचे 208 जुने खासदार विजय झाले आहेत पण जिथे उमेदवार न पाहता कोणालाही तिकीट दिले गेले तिथेच पराभवाचा धक्का बसला आहे. अनेक राज्यांमध्ये अशी उमेदवारी दिल्याने त्यांचा पराभव झाला आहे.भाजपला माहीत होते आणि त्यांच्या अंतर्गत सर्वेक्षणात कोणते उमेदवार पराभूत होणार आहेत हे देखील समोर आले होते परंतु त्यांनी काळजी न करता त्या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली तर ते उमेदवार नक्कीच विजय होतील असे सांगितले. अशा अनेक ठिकाणी भाजपने सर्वेक्षणाच्या विरोधात जाऊन तिकिटे दिली.

पुढे बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की अबकी बार ४०० पार यात काही चूक नव्हती. पण ती घोषणा अर्धीच होती. त्यांना 400 जागा का हव्या आहेत हे त्यांनी स्पष्ट सांगायला हवे होते. तुम्ही 400 च्या पुढे जागा पाहिजे आहेत असे म्हणालात परंतु तो काही लोकांना तुमचा अहंकार वाटू लागला तर काहीना ते षडयंत्र आहे असे वाटले ज्याचे भांडवल करून विरोधकांनी म्हटले की त्यांना संविधान बदलण्यासाठीच 400 पार हवे आहेत.

अबकी बार 400 पार हा भाजपचा अर्धवट नारा ज्यांनी लिहिला त्याची ही सर्वात मोठी चूक होती.याशिवाय भाजपच्या काही नेत्यांनी त्यांना संविधान बदलण्यासाठी 400 जागा द्या असे म्हटल्याचे सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याने भाजपचे मोठे नुकसान झाले.जे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करत होते त्यांचा एकच उद्देश होता आम्हाला कोणत्याही परिस्थितीत भाजपला रोखायचे आहे त्याचा फटका भारतीय जनता पार्टीला बसला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *