मातंग समाजाच्या प्रश्नाबाबत ऑनलाईन बैठक – डॉ नीलम गोऱ्हे

मातंग समाजाच्या प्रश्नाबाबत सामाजिक संस्था व सामाजिक न्याय मंत्री यांच्यासोबत ऑनलाईन बैठक – डॉ नीलम गोऱ्हे Online meeting on Matang community issues – Dr. Neelam Gorhe

पुणे /मुंबई,14/06/2021 – मातंग समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबीत असून ते मार्गी लावण्या संदर्भात बाळासाहेब भांडे ,सदस्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती यांनी डॉ नीलम गोऱ्हे यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यामध्ये
१) क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाचे पुनर्गठन करुन आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्तीची नेमणूक करुन आयोगास संविधानिक दर्जा व निधी मिळणे,

२) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळासाठी अध्यक्ष व संचालकांची नियुक्ती करुन दरवर्षीच्या बजेटमध्ये तरतूद करणे

३) पुण्यातील क्रांतिगुरु लहुजी साळवे यांचे स्मारक निर्माणासाठी जागा खरेदी व बांधकाम करण्यासाठी आर्थिक तरतूद करणे

४) मुंबईतील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक निर्मितीसाठी आर्थिक तरतूद करणे

   अशा विषयांचे निवेदन प्राप्त झाले आहे. या बाबत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे  यांच्या बरोबर सामाजिक संस्था व वरिष्ठ अधिकारी यांची ऑनलाईन बैठक आज दि १५ जून रोजी दुपारी २.०० वा आयोजित केली आहे. या बैठकीला श्याम तांगडे प्रधान सचिव सामाजिक न्याय, डॉ प्रशांत नारनवरे आयुक्त सामायिक न्याय व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत असे डॉ नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे मार्फत आवश्यक प्रयत्न शासन स्तरावरून  करण्यात येत आहेत असेही डॉ गोऱ्हे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: