कारखान्यांनी ऊस बीले नाही दिले तर उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार – ज्ञानेश्वर जवळेकर

कारखान्यांनी ऊस बीले नाही दिले तर उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार – ज्ञानेश्वर जवळेकर If factories do not give sugarcane bills,there will be a violent agitation – Dnyaneshwar Jawalekar

त्या आंदोलनास तुर्तास स्थगिती
पंढरपूर – पंढरपूर तालूक्यातील साखर कारखान्यांनी शेतक-यांची मागील ऊस बीले व कामगारांचे पगार अद्यापही दिले नाहीत त्याच अनुषंगाने बळीराजा शेतकरी संघटनेने दि.16 रोजी धरणे आंदोलन पुकारले होते .याप्रसंगी तहसिलदार व नायब तहसिलदार आणि सर्व कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्याशी चर्चा करुन व लेखी ठोस आश्वासन घेऊन त्या आंदोलनास तुर्तास स्थगिती दिली आहे.

 तालुक्यातील सर्व कारखान्याच्या कार्यकारी संचालकांसमवेत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत विठ्ठल सह.साखर कारखाना,सहकार शिरोमणी साखर कारखाना व सिताराम साखर कारखाना यांनी आंदोलनकर्ते बळीराजा संघटनेस ठोस लेखी पत्र दिले असून सदरील ऊस बीले  व पुर्ण एफआरपी रक्कम व कामगारांच्या पगारी येत्या पंधरा ते वीस दिवसात देऊ असे आश्वासन कारखान्यांनी दिले आहे जर दिलेल्या कालावधीत कारखान्यांनी ऊस बीले नाही दिले तर उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर यांनी दिला आहे .

  यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे नितीन बागल, सर्जेराव शेळके,शेखर कोरके,रमेश भोसले, दामाजी मोरे,किसान युवा क्रांतीचे प्रतापसिंह चंदनकर, रामेश्वर झांबरे,रमेश लंगोटे,शेतकरी रामदास खराडे,उत्तम महाडिक,तानाजी खराडे, विकास खराडे,औदुंबर सुतार,तानाजी सोनवले, मारूती कोळशे,सचिन जवळेकर,सुरज भांगे,विष्णू भोसले,प्रवीण नाईकनवरे, नितीन गावडे,अनिल शिंदे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

    शेतकर्‍यांनी अशी आंदोलने किती वेळा करायची ? शेतीची कामे करायची का आंदोलने करत राहायची ? प्रत्येक वेळी आंदोलनानंतर बील,पगार नक्की मिळणार असे आश्वासन दिल्यानंतर शेतकरी आज नाहीतर उद्यातरी पैसे मिळेल या आशेवर जगत आहे. अशाप्रकारे फक्त शेतकर्‍यांचा अंत पाहिला जात आहे.एक दिवस हे घातक परिणाम करणारे आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: