Chinas Population: चिनी लोकसंख्येच्या इतिहासाला धक्का; वर्षभरात पाच लाखांहून कमी वाढ


हायलाइट्स:

  • चीनमध्ये गेल्या वर्षी एकूण लोकसंख्येत पाच लाखांहूनही कमी वाढ
  • देशातील जन्मदर सलग पाचव्या वर्षी घसरलेला
  • चीनमध्ये लोकसंख्याशास्त्रीय बदल होण्याची शक्यता

बीजिंग, चीन :

जगात सर्वाधिक लोकसंख्येचा रेकॉर्ड वर्षानुवर्षे आपल्या नावावर कायम राखणाऱ्या चीनला गेल्या वर्षीच्या आकड्यांनी मात्र मोठा झटका दिलाय. चीनची लोकसंख्या गेल्या वर्षीच्या अखेरीस १.४१२६ अब्ज राहिली. अर्थात गेल्या वर्षात एकूण लोकसंख्येत पाच लाखांहूनही कमी वाढ चीनमध्ये नोंदविण्यात आलीय. नुकतंच तीन अपत्यांना जन्म देण्याची परवानगी देणाऱ्या चीनसाठी हा मोठा धक्का आहे.

चीनच्या लोकसंख्येत गेल्या वर्ष अर्ध्या दशलक्षापेक्षाही कमी वाढ झालीय. देशातील जन्मदर सलग पाचव्या वर्षी खाली असल्याचं दिसून येतंय. यामुळेच सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनला आर्थिक धोक्याचीही चाहूल लागलीय.

‘नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स’च्या (NBS) म्हणण्यानुसार, २०२१ च्या अखेरीस चीनमध्ये लोकसंख्या १.४१२० अब्जावरून १.४१२६ अब्जावर पोहचली आहे. एनबीएस डेटानुसार, २०२० च्या तुलनेत चीनची लोकसंख्या वर्षभरात केवळ ४,८०,००० नी वाढली.

VIDEO: टोंगाच्या समुद्रात भयंकर ज्वालामुखीचा उद्रेक… त्सुनामीचा धोका टळला
India Pakistan: पाकिस्तानला झोंबले भारताचे ‘गहू’; ‘पब्लिसिटी स्टंट’ असल्याची टीका
हाँगकाँग स्थित ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या म्हणण्यानुसार, २०२१ मध्ये १.०६ कोटी अपत्यांचा जन्म झाल्याची नोंद केली आहे. हीच संख्या २०२० साली १.२० कोटीवर होती.

या महिन्याच्या सुरुवातीला हेनान प्रांताधिकाऱ्यांनी केलेल्या नोंदीनुसार, २०२० मध्ये नवजात मुलांची संख्या ९,२०,००० पर्यंत घसरली आहे. ही संख्या २०१९ च्या तुलनेत २३.३ टक्क्यांनी कमी आहे. इथं जन्मदर १००० व्यक्तींमागे ९.२४ इतका खाली आलाय. उल्लेखनीय म्हणजे, हेनान हा चीनचा तिसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला प्रशासकीय प्रदेश आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, चीनमध्ये लोकसंख्याशास्त्रीय बदल होऊ शकतात. जे देशाच्या वाढत्या आर्थिक विकासासाठी धोकादायक ठरू शकतात. लोकसंख्येच्या असंतुलित वाढीमुळे कर्मचार्‍यांचं प्रमाण तसंच अवलंबित व्यक्तींच्या (पेन्शन आणि इतर लाभांसह सेवानिवृत्त) संख्येवर विपरित परिणाम होऊ शकतो. यामुळे अर्थव्यवस्थेवर दबाव पडू शकतो.

Texas Attack: १० तासांच्या थरारनाट्यानंतर सिनेगॉगमधील ओलिसांची मुक्तता, हल्लेखोर ठार
India-Nepal: भारताची सीमेबाबत भूमिका कायम, नेपाळला ‘मैत्रिपूर्ण’ समजSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: