Crime news

काठमांडू येथील न्यायालयाने संदीप लामिछानेला ८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली

नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछानेला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले

नवी दिल्ली – नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.आता याच प्रकरणाची सुनावणी करताना काठमांडू येथील न्यायालयाने संदीपला ८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

लेगस्पिनर संदीप 2018 मध्ये पहिल्यांदा आयपीएल खेळला होता तेव्हा त्याचे वय फक्त १७ वर्षे होते.संदीपला दिल्ली डेअरडेव्हिल्सने २० लाख रुपयांना विकत घेतले होते.संदीपने आयपीएलमध्ये 9 सामने खेळले ज्यात त्याने 13 विकेट घेतल्या.  आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये संदीपने नेपाळ संघाच्‍या 52 टी-20 मध्‍ये 98 आणि 51 एकदिवसीय सामन्यात 112 विकेट घेतल्या आहेत.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 बळी घेण्याचा विक्रम संदीपच्या नावावर आहे.लामिछानेने अवघ्या 42 सामन्यांत 100 बळींचा आकडा गाठला होता.  संदीपने 44 सामने घेतलेल्या राशिद खानला मागे टाकले होते. संदीप लामिछाने हा मोजक्या गोलंदाजांपैकी एक आहे ज्यांनी सलग तीन एकदिवसीय डावात चार किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत.

नेपाळचा स्टार खेळाडू संदीप लामिछाने जगभरातील क्रिकेट लीग खेळणारा देशातील एकमेव खेळाडू आहे.आयपीएलमध्ये खेळणारा संदीप हा नेपाळचा पहिला क्रिकेटपटू आहे तर ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीग (BBL), कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) आणि लंका प्रीमियर लीग (LPL) यासह अनेक लीगमध्ये खेळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *