जीवनरक्षा समिती कडून कोरोना योध्दा सन्मान

जीवनरक्षा समितीकडून कोरोना योध्दा सन्मान Corona Warrior Honor from jivanraksha samittee
 कुर्डुवाडी/ राहुल‌ धोका - कुर्डुवाडी शहरात जीवनरक्षा समिती कडुन डाॅक्टर्स डे निमित्ताने कोरोनाच्या पहिल्या लाटेपासुन औषधोपचार  काम करणाऱ्या वैदकीय क्षेत्रातील कोरोना तज्ञ डॉक्टर तसेच स्टाफ चा सन्मान पत्र,शाल ,श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला .

  जेष्ठ नागरीक संघटनेचे अध्यक्ष किरण गोडसे, समितीचे अध्यक्ष राहुल धोका,साधना करंदिकर , दर्शन देवी यांच्याकडून हा सत्कार करण्यात आला. डाॅ चंद्रशेखर साखरे ,डाॅ रविंद्र बोबडे ,डाॅ विलास मेहता,डाॅ रोहित बोबडे,डाॅ लकी दोशी ,डाॅ जयंत करंदिकर,डाॅ अशिष शहा,डाॅ प्रसन्न शहा,डाॅ संतोष सुर्वे,डाॅ मारवेल साडे, डाॅ.प्रिया जानराव,डाॅ बाहुबली दोशी,डाॅ स्वाती रुपदास,डाॅ विनायक रुपदास यांचा सन्मान कुर्डुवाडी शहराच्यावतीने संस्थेच्या माध्यमातुन करण्यात आला. त्याच प्रमाणे कोरोना काळात मेडीकल स्टाफ चे कार्य करणारे रोहिणी करंडे ,सनिता जानराव, स्वाती खेडकर, सिमा चांदणे, नितीन आठवले,नितीन लंकेश्वर,तेजस गवळी, आशा पवार,सुरज लंकेश्वर,मंदाकिनी ठेंगल, करिश्मा आत्तार,राम गायकवाड आदिंचा ही सन्मानपत्र देवून प्रातिनिधिक स्वरुपात सन्मान करण्यात आला.

    यावेळी शंकर वेदपाठक,बाळासाहेब शेंडगे, प्रकाश शहा,दादा डिकोळे,वसंतराव मुंडवे,मनोज खडके आदिसह मान्यवर उपस्थित होते. 

सत्कारास उत्तर देताना डाॅ चंद्रशेखर साखरे यांनी सरकारने निश्चित केल्यादरात उपचार करणे शक्य नसून आँक्सीजन, औषधे त्याचप्रमाणे मेंटेनन्स या विषयी पुनर्विचार आवश्यक आहे.त्यांनी समस्त कुर्डुवाडीकरांचे सहकार्याबद्दल आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: