मंगळवेढा तालुक्यासाठी खरीप हंगामाचा 13 कोटी रुपये पिक विमा मंजूर – आ. समाधान आवताडे

मंगळवेढा तालुक्यासाठी खरीप हंगामाचा 13 कोटी रुपये पिक विमा मंजूर – समाधान आवताडे


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/०७/२०२४ – मंगळवेढा तालुक्यामध्ये पुनर्रचित हवामानावर आधारित खरीप 2023 वर्षासाठीचे खरीप हंगामातील पिकाचे पिकविमे 51 हजार 272 हेक्टर क्षेत्रावर भरले होते. त्यातील 47 हजार 80 शेतकऱ्यांना सुमारे 13 कोटी रुपये पिक विमा मंजूर झाला असून लवकरच त्यांच्या खात्यावर पिक विम्याची रक्कम वर्ग होणार असल्याची माहिती पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आ.समाधान आवताडे यांनी दिली आहे.

यामध्ये मध्य प्रतिकूल परिस्थितीत बाजरी पिकासाठी 11 हजार 58 शेतकऱ्यांनी विमा भरला होता त्यातील 10 हजार 106 शेतकऱ्यांना दोन कोटी 59 लाख रुपयाचा पिक विमा खात्यावर जमा झाला असून उर्वरित शेतकऱ्यांचे खाते नंबर आधार कार्डशी संलग्न नसल्यामुळे त्यांना केवायसी केल्यानंतरच हे पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत. त्याचबरोबर वैयक्तिक कंपनी तक्रार केल्यानंतर पंचनामे होऊन नैसर्गिक आपत्ती मधून कांदा तूर मका बाजरी या पिकासाठी 2 हजार 531 शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार केली होती. त्या तक्रारदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी 2 कोटी 86 लाख रुपये मंजूर झाले असून तेही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. सीसीइ आधारित 33 हजार 491 शेतकऱ्यांचाही पिक विमा मंजूर झाला असून सात कोटी 31 लाख 70 हजार रुपये मंजूर असून तेही लवकरच खात्यावर जमा होणार आहेत.

त्याचबरोबर फळपिक विमा योजनेच्या बाबतीतही पाठपुरावा सुरू असून यावर्षीही सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरवून घेणे गरजेचे आहे. शासनाने एक रुपयात विमा सुरू केला असून सर्व शेतकऱ्यांनी या विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे .


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading