माराेळी येथे अनैतिक संबधातुन तरूणाचा खून,दाेघांना केली पाेलिसांनी अटक
मंगळवेढा/प्रतिनिधी – मंगळवेढा तालुक्यातील मारोळी इथे अनैतिक संबंधातून एका 29 वर्षेीय तरुणाचा खून करण्यात आला असून या प्रकरणी सुभाष होनमाने, संजय होनमाने या दोघाविरुद्ध पाेलिसांनी गुन्हा दाखल करून दाेघांना अटक केली आहे.
पाेलीस सुत्रांनी दिलेल्या माहीतीप्रमाणे यातील 32 वर्षेीय विवाहित महिलेचे मयत सागर इंगोले( रा.सलगर बुद्रुक) याच्याशी गेल्या दोन वर्षापासून अनैतिक संबंध होते. या घटनेतून दि. 26 एप्रील रोजी पहाटे ४.०० वाजताच्या सुमारास मारोळी तालुका मंगळवेढा या गावातील होनमुखे वस्ती येथील आरोपीच्या घराजवळ आराेपी पती व दिराने सागर मनोहर इंगोले यास काठीने डोकीत मानेवर तसेच सर्वांगावर मारून जखमी करून तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्याचा खून केला आहे. मयताच्या डोकीत काठीने मारून गंभीर जखमी करून खून केला असल्याची फिर्याद मयताचे वडील मनोहर इंगोले ( रा.सलगर बु.) यांनी पोलिसात दिल्यानंतर सुभाष होनमाने, संजय होनमाने या दाेघा आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दाखल करणारे अधिकारी सपोनी श्री लातूरकर असून या गुन्ह्याचा अधिक तपास मंगळवेढा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे हे पोलीस निरीक्षक मंगळवेढा पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. सुभाष होनमाने, संजय होनमाने या दाेन्ही आरोपीना तात्काळ अटक करण्यात आली असून मंगळवेढा पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 317 / 2025 BNS कलम 103(1),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

