अकोल्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील महिला पोलिसांची प्रकृतीत बिघाड-विधान परिषद उपसभापती डॉ निलम गोऱ्हे यांनी केली चौकशीची मागणी

अकोल्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात महिला पोलिसांच्या शेवटच्या आठवडा सुमारास प्रकृतीत बिघाड

पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/३/२०२४ – अकोल्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात महिला पोलिसांची दुषित पाणी पिल्याने मार्च २४ (शेवटच्या आठवडा सुमारास )प्रकृतीत बिघाड झाला होता त्याची चौकशी होण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषद उपसभापती डॉ निलम गोऱ्हे यांनी निर्देश दिले आहेत.

दि.३० मार्च रोजी अकोल्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात काही महिला पोलिसांची दुषीत पाणी पिल्यामुळे अचानक प्रकृती बिघडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातील 30 महिलांना काविळीची बाधा झाली आहे.
या मुलींना ज्या खाजगी इस्पितळामध्ये दाखल केलेले आहे त्यांचा सर्व खर्च अकोला येथील पोलीस अधीक्षक कार्यालयांने करावा.परिणामी कोणताही हॉस्पिटलचा भार या प्रशिक्षणार्थींवरती पडणार नाही.
दूषित पाण्यामुळे ही कावीळ झाली असावी असे वाटते कारण अनेक आश्रम शाळांना भेट दिलेल्या आहेत त्यावरून काही निरीक्षण नोंदवत आहे.पिण्याचे पाणी व बाथरुमच्या पाण्याची लाईन झिरपुन त्यात पाणी एकत्र झालेले अनेकदा पहायला मिळते.पाणी जरी आर ओ चे पिण्यासाठी असेल तरी स्वयंपाकासाठी दुसरे पाणी वापरले जाते का? तसेच स्वयंपाक शुद्ध केला जातो का त्याची तपासणी झाली पाहिजे.तापमान वाढलेले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात असा काही मुलींना त्रास झाला आहे का ? खाद्य पदार्थांमध्ये काही मिश्रण झालेले आहे का ? त्याच्या मूळ कारणापर्यंत गेले पाहिजे.

नव्याने मुलींना त्याचा त्रास होणार नाही त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी लागेल.या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून वैद्यकीय अहवाल लक्षात घेऊन कशातून बाधा झाली आहे ते तपासावे अशी मी सुचना करत आहे.

त्याचबरोबर त्या मुलींना उपचारातून बरे झाल्यावर सानुगृह अनुदान देण्यात यावे, त्यांना विश्रांतीचीसुद्धा आवश्यकता आहे. याचा सर्व विचार सरकारने करावा.

प्रशिक्षण केंद्रांमध्ये जंतुनाशके व पेस्ट कंट्रोल करुन बाकीची स्वच्छता आणि या सगळ्या गोष्टींबरोबर पाण्याचा सोर्स तपासून घेतला पाहिजे.तेथील महिला पोलिस अधिकाऱ्यांची प्रशिक्षण केंद्रावर एक समिती करावी.अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून प्रशिक्षण केंद्रात वारंवार तपासणी करण्यात यावी.सदर घटनेचा कसून तपास करुन संबंधित महिलांना न्याय मिळवून देण्यात यावा.

वरील घटने संदर्भात खालील मागण्या आपणास करण्यात येत आहेत. याबाबत संबंधित अधिकारी यांना योग्य आदेश देण्यात यावेत असेही विधानपरिषद उपसभापती डॉ निलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

घटनेचा तपास अधिक जलदगतीने करावा व कोणाकडूनही हलगर्जीपणा झाला असल्यास चौकशी करून कडक कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र विधान परिषद, उपसभापती आणि अध्यक्षा – स्त्री आधार केंद्र, पुणे डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *