व्हॉटस ॲपवर अज्ञात नंबरवरुन फोटो किंवा व्हिडीओ येत असेल तर डाउनलोड करु नका- ॲड.चैतन्य भंडारी
धुळे/ज्ञानप्रवाह न्यूज – हल्ली सायबर गुन्ह्यांचे प्रमाण देशभरात वाढलेले आहे आणि सायबर गुन्हेगार दिवसेंदिवस लोकांना गंडा घालण्यासाठी विविध नविन युक्त्या वापरत आहेत. हल्ली सायबर गुन्हेगारांनी व्हॉटस ॲपच्या माध्यमातून नागरीकांना फसवण्याची सुरुवात केलेली आहे.

जसे की,एखादया व्यक्तीला व्हॉटस ॲपवर एका अज्ञात नंबरवरुन फोटो किंवा व्हिडीओ पाठवण्यात येतो आणि जर त्या व्यक्तीने तो फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केला तर त्यांचे बँक खाते रिकामे होवू शकते.याचे कारण असे की,ज्या व्यक्तीने त्याच्या मोबाईलमध्ये अज्ञात व्यक्तींकडून आलेले फोटो डाउनलोड केले होते ते फोटो एका मॉलवेअर किंवा व्हायरस होते.त्या व्हायरस व्दारे तुमचा मोबाईलची खाजगी माहिती सदरील सायबर गुन्हेगाराकडे सहजपणे पोहोचते.
म्हणून नागरीकांना ॲड.चैतन्य भंडारी यांनी आवाहन केले आहे की, जर आपल्याला अज्ञात नंबरवरुन फोटो किंवा व्हिडीओ आले असेल तर ते डाउनलोड करु नका. व्हॉटस ॲपमध्ये ऑटो डाउनलोडचे ऑप्शन कायम स्वरुपी बंद ठेवा.सर्वप्रथम खात्री करा की सदरील अज्ञात नंबर हा कोणाचा आहे आणि चुकून जर आपल्यासोबत काही सायबर फ्रॉड झाला असेल तर आपण १९३० किंवा १९४५ या टोल फ्री नंबर आपली तक्रार करावी असे आवाहन ॲड.चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

