मावळा प्रतिष्ठान यांच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी
कासेगांव/ज्ञानप्रवाह न्यूज /शुभम लिगाडे, दि.14 मे – मावळा प्रतिष्ठान यांच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती कासेगांव ता.पंढरपूर येथे साजरी करण्यात आली.

यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करण्यात आले.त्यानंतर मावळा प्रतिष्ठानच्यावतीने प्रसाद वाटप करण्यात आला.याप्रसंगी मावळा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर येथे झाला.मराठा साम्राज्याचे ते दुसरे छत्रपती होते. छत्रपती संभाजी महाराज हे सुसंस्कृत, सुशिक्षित आणि मराठी व्यतिरिक्त संस्कृत आणि हिंदुस्तानी भाषेत पारंगत होते . छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या हयातीत अनेक पुस्तके लिहिली ज्यात संस्कृतमध्ये बुधभूषणम आणि हिंदुस्तानी मध्ये नायिकाभेद ,सातसतक आणि नखशिखा यांचा समावेश आहे. बुधभूषणममध्ये छत्रपती संभाजी महाराज यांनी राजकारणावर कविता लिहिल्या, ज्यामध्ये राजा आणि लष्करी रणनीतींसाठी काय करावे आणि काय करू नये यासारख्या गोष्टींचा समावेश आहे .छत्रपती संभाजी महाराज यांना लहानपणापासूनच रणांगणावरील मोहिमा आणि डावपेच यांचे बाळकडू मिळाले होते.


