राजकीय सुसंस्कृतीचे दर्शन पंढरपूर येथे पाहायला मिळते ही अभिमानास्पद बाब….आमदार समाधान आवताडे
पंढरपुरात राष्ट्रवादी युवकच्या श्रीकांत शिंदे यांच्याकडून विविध कार्यक्रम संपन्न
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- सध्याच्या राजकीय पक्षाला शिस्त लागणे आवश्यक असताना आज पंढरपूर येथे सर्व पक्षाचे आमदार एकाच व्यासपीठावर आणून त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने सन्मान होणे हे राजकीय सुसंस्कृतीचे दर्शन पहायला मिळत आहे ही बाब खऱ्या अर्थाने कौतुकाची बाब आहे असेच म्हणावं लागेल असे प्रतिपादन मंगळवेढा पंढरपूर चे आमदार समाधान आवताडे यांनी केले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शिवशंभो गर्जना सांस्कृतिक कार्यक्रम व सन्मान भूमिपुत्रांचा घेण्यात आला तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरणही युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण व उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पंढरपूर तालुका हा चार विधानसभा मतदार संघात विभागला असून त्याचे प्रतिनिधित्व करत असलेल्या आमदारांना भूमिपुत्र म्हणून माढा चे आमदार अभिजित पाटील,पंढरपूर मंगळवेढा चे आमदार समाधान आवताडे, सांगोल्याचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांचा सन्मान चिन्ह व शाल देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी आमदार अभिजित पाटील,आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख,सोलापूर जिल्ह्याचे नेते उमेश पाटील,युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी श्रीकांत शिंदे यांच्या कार्याबद्दल गौरव उद्गार काढून त्यांना पुढील काळात पक्ष नक्कीच ताकद देईल हा विश्वास देतो अन् श्रीकांत हा सोलापूर जिल्ह्यातील पवार परिवारावर जीवापाड प्रेम करणारा कार्यकर्ता असून उपमुख्यमंत्री अजित दादा ही कायम त्याला बळ देण्याचे काम करत असतात.सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी कायम अजितदादांकडे पाठपुरावा करणारा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. राजकीय पटलावर सर्व पक्षांना एकत्र आणणे हे फक्त श्रीकांत यांनी प्रेमाने सर्वांना जिंकले हेच यातून दाखवून दिले असे विचार व्यक्त केले .
यावेळी छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त शिवशंभो गर्जना सांस्कृतिक कार्यक्रम झाला. चार दिवस पावसाचे वातावरण असतानाही कार्यक्रमाचे वेळी एक थेंबही पाऊस आला नाही म्हणजे निसर्गही श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे असे गौरव उद्गार आमदार समाधान आवताडे यांनी काढले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे, उपनगराध्यक्ष सुधीर धोत्रे,माजी नगरसेवक किरण घाडगे,संजय बंदपट्टे,शिवसेनेचे संजय साठे,डी राज सर्वगोड,गणेश आधटराव,विश्वजीत भोसले,विशाल आर्वे,श्रीनिवास उपळकर,सारंग महामुनी,सूरज पेंडाल, अमोल परबतराव,शुभम पवार,रफिक मुलाणी,प्रदीप निर्मळ,प्रदीप तांदळे,विजय अभंगराव,पै.मनमोहन अभंगराव, प्रशांत मलपे आदी मान्यवर उपस्थित होते
शिवशभो गर्जना सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थित जनतेची मने जिंकली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अंकुश गाजरे सर यांनी केले.

