कारहुनवी सणानिमित्त सजवलेल्या गाढवांची मिरवणूक काढण्यात आली

कारहुनवी सणानिमित्त सुनील काडे यांच्या सजवलेल्या गाढवांची मिरवणूक काढण्यात आली

सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०६/२०२५ – काँग्रेसचे सोलापूर शहर अध्यक्ष चेतन नरोटे, युवा नेते जॉन फुलारे, वाहिद बिजापूरे यांच्या उपस्थितीत कारहुनवी सणानिमित्त सुनील काडे यांच्या सजवलेल्या गाढवांची मिरवणूक काढण्यात आली.

मनुष्य कर्माने किंवा पदाने कितीही जरी मोठा असला तरी त्यांनी आपली संस्कृती विसरून चालणार नाही .भूतदया परमो धर्म या उक्तीनुसार प्राण्यांनाही आपल्याप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. कारहूनवी सण (बैलपोळा) आजचा हा मंगल दीन प्रत्येक शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा खरा उत्सव असतो. शेतकरी आपल्या बैलांना सजवून जल्लोषात गावभर मिरवणूक काढत असतो अगदी तसेच सोलापूर शहरातील लष्कर भागातील सुनील कुरमय्या काडे यांच्या बांधकाम आणि वीटभट्टी कामात दिवसरात्र गाढवांची साथ लाभते. आपल्या सोबत वर्षभर निस्वार्थीपणे काबाडकष्ट करून आपल्यासाठी राबणाऱ्या या जीवाला आपण काहीतरी देणे आपले कर्तव्य आहे हे समजून आज कारहूनवी (बैलपोळा) निमित्त त्यांच्याजवळ असणाऱ्या जवळपास २५ गाढवांना सजवून सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे,युवा नेते जॉन फुलारे, युवा नेते वाहिद बिजापूरे,बोड्डू शेख,योहान कानेपागूल यांच्या हस्ते पुरणपोळी आणि मिष्ठान्न खाऊ घालून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढली.

यावेळी तिरुपती परकीपंडला,सुरेश फरड, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे,रवी जंगम, योहान सातालोलू,व्यंकटेश बोम्मेन, भीमराज गोण्यांल, देविदास म्हेत्रे, प्रकाश जंगम, रामू म्हेत्रे, रजत आसरेड्डी,अजय खाडे, आकाश फलटण, उमेश कुमार, अब्बू म्हेत्रे,आनंद शिरोळू यांच्यासह लष्कर भागातील नागरिक बंधु भगिनी मिरवणुकीत सहभागी झाले होते.

Leave a Reply

Back To Top