जमिनीचे आरोग्य सांभाळणे अत्यंत गरजेचे – अंकुश पडवळे

जमिनीचे आरोग्य सांभाळणे अत्यंत गरजेचे – अंकुश पडवळे

नान्नज येथे सेंद्रिय शेती कार्यशाळेत मार्गदर्शन

सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज – जमिनीमध्ये चांगले विषमुक्त सेंद्रिय उत्पादन घेण्यासाठी व जमिनीची सुपीकता कायम टिकवण्यासाठी जमिनीचे आरोग्य अत्यंत गरजेचे आहे असे मत कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी व्यक्त केले.

सोलापूर तालुका पोलीस स्टेशन व युथ संकल्प फाउंडेशन नान्नज यांच्यावतीने नान्नज उ.सोलापूर येथे सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन केले होते त्यावेळी अंकुश पडवळे बोलत होते.सोलापूर ग्रामीण पोलीस विभागाचे जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून सदर कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमासाठी सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे,रोहयो परिषदेचे अध्यक्ष शहाजी पवार,कृषिभूषण दत्ता काळे, कृषिभूषण नागेश ननवरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, माजी सरपंच विनायक सुतार, प्रगतशील शेतकरी हनुमंत गवळी,स्वराज ट्रॅक्टर चे वितरक संजय मेटकरी, शाहरुख पटेल आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे बोलताना अंकुश पडवळे म्हणाले की, शेतीमध्ये जमिनीला अत्यंत महत्त्व असून जमिनीला लाखो वर्षाची परंपरा आहे पण आपण मागील दहा ते पंधरा वर्षात जमिनीचे आरोग्य खतांचा व औषधांचा अतिरेक करून जमीनीचा पोत बिघडवल्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी झाला आहे. जमिनीचे माती परीक्षण करून गरजे इतकाच रासायनिक खतांचा वापर करून सेंद्रिय खत घरच्या घरी तयार करून त्याचा वापर जमिनीत वाढवल्यास जमिनीचे आरोग्य तर सुधारेलच पण मानवी आरोग्यही सुधारेल.शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नियोजनपूर्वक कष्ट करून शेतीत वेळ दिला तर शाश्वत शेतीचे मॉडेल उभारायला वेळ लागणार नाही. शेतकऱ्यांनी अँड्रॉइड फोनचा वापर शेतीतले ज्ञान मिळवण्या साठी करून शेतीतील मार्केटिंगचा अभ्यास करून पिकांची लागवड करणे ही अत्यंत गरजेचे आहे असे अंकुश पडवळे म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी केले.तर शहाजी पवार, दत्ता काळे,अभय गायकवाड,संभाजी दडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युथ संकल्प फाउंडेशनचे संभाजी दडे,योगेश गवळी,अभय गायकवाड यांनी प्रयत्न केले.

नान्नज उ.सोलापूर येथे सेंद्रिय शेती कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कृषिभूषण अंकुश पडवळे

कृषिभूषण अंकुश पडवळे यांच्या मार्गदर्शनातील प्रमुख मुद्दे –

१ शेतीकडे व्यावसायिक दृष्टीतून शेतकऱ्यांनी पहावे
२ शेतीमध्ये शेतकऱ्यांनी शेतमजूर शेतात येण्यापूर्वी शेती अवजारा सहित सर्व नियोजन तयार ठेवावे
३ शेतकऱ्यांनी शेतीत वेळ देणे अत्यंत गरजेचे
४ शेतकऱ्यांनी शेतात शेणखत प्रेसमड व कोंबडी खताचे सुयोग्य मिश्रण करून सेंद्रिय खत बनवावे
५ शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावा
६ मार्केटिंग चा अभ्यास करूनच पिकांची निवड व वेळ ठरवावी
७ शेतकऱ्यांनी अँड्रॉइड फोनचा वापर शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठीच करावा
८ शाश्वत शेतीसाठी जमिनीचे आरोग्य,वेळ, मार्केटिंग चा अभ्यास व सुयोग्य तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा

नान्नज उ.सोलापूर येथे सेंद्रिय शेती कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कृषिभूषण अंकुश पडवळे

Leave a Reply

Back To Top