सोलापूर येथील जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये परदेशी बॅडमिंटन ॲकॅडमीला यश

सोलापूर येथील जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये परदेशी बॅडमिंटन ॲकॅडमीला यश

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- सोलापूरमध्ये नुकत्याच जिल्हा स्तरीय बॅडमिंटन स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धेमध्ये पंढरपूर येथील परदेशी बॅडमिंटन ॲकॅडमीला मोठे यश प्राप्त झाले आहे यात एकूण पाच विजेतेपद,सात उपविजेतेपद व वीस जणांना उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारता आली.परदेशी अकॅडमीमधून एकूण ४८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

सिंगल बॅडमिंटन स्पर्धेमध्ये श्रुतिका बोरगावकर हिने वयोगट १३ वर्ष व १५ वर्ष मुली या दोन्ही गटा मध्ये विजेतेपद मिळवले तर अक्षरा यादव हिने वयोगट १७ व १९ मुली या दोन्ही गटा मध्ये सलग तीसर्या वर्षीही विजेतेपद मिळवले.

दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सृष्टी सागर व श्रुतिका बोरगावकर यांनी १५ वर्ष मुली मध्ये विजेतेपद मिळवले तर मुलांमध्ये मित बजाज व आर्यन कटकमवार वयोगट १७ वर्षे मुले या गटामध्ये विजेतेपद मिळवले.

सृष्टी सागर हिने वयोगट १३ व १५ वर्ष मुली दोन्ही गटा मध्ये उपविजेतेपद मिळवले तर सान्वी भाळवणकर हिने १० वर्ष मुली मध्ये उपविजेतेपद मिळवले.ओपन गटामध्ये विजय बडवे व आदित्य सुपेकर यांनी दुहेरी स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले तर श्रवण बजाज व मित बजाज यांनी १९ वर्ष दुहेरी मुलांमध्ये उपविजेतेपद मिळवले.सर्व विजेत्यांना स्पर्धा संपल्यानंतर सन्मानित करण्यात आले व मानाची ट्रॉफी देण्यात आली.

या स्पर्धेमध्ये एकूण ३०० हून अधिक प्रवेश आले होते.क्षृतिका श्रीनिवास बोरगावकर हिला तिहेरी मुकुटाचा मान मिळाला तर अक्षरा अण्णासाहेब यादव हिने दुहेरी मुकुटाचा मान मिळवला.

परदेशी बॅडमिंटन अकॅडमीचे प्रशिक्षक श्रीपाद परदेशी,विजय बडवे,आकाश शिंदे, युवराज साळुंखे,श्री.शेख,रिटा परदेशी व प्रिया विभूते यांचे सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांचे देखील विद्यार्थ्यांबरोबर अभिनंदन होत आहे.

याप्रसंगी कोच श्रीपाद परदेशी यांनी सांगितले की सदर यश मिळवण्यामध्ये ॲकॅडमीतील विद्यार्थ्यांनी खूप परिश्रम घेतले आहेत.मागील तीन वर्षापासून ते सातत्याने सराव करत आहेत.समर कॅम्प मध्ये मेहनत घेतली आहे व याचबरोबर अभ्यास करत परीक्षेमध्येही चांगले यश मिळवले आहे व ट्रेनिंगला येत आहेत याचेच हे फळ आहे. ज्यांना यश मिळाले नाही त्यांनी नाराज न होता अजून सराव करून पुढील वर्षी आपण विजेतेपद मिळवूया असे सांगितले.

Leave a Reply

Back To Top