दवाखान्याची एक नवी सुरवात करणाऱ्या वैद्य मित्रांसाठी चार शब्द

छोटेसे मार्गदर्शन

दवाखान्याची एक नवी सुरवात करणाऱ्या वैद्य मित्रांसाठी चार शब्द

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – अरे पेशंट 50 टक्के विश्वासावर बरे होतात माझा अनुभव आहे,अरे देवावर विश्वास ठेवला तरी तुमचा प्रॉब्लेम दूर होतो. देवाची मूर्ती च काय पण शिंदुर फासलेल्या दगडाला देव मानून विश्वास ठेवला तरी गुण येतो हा अनुभव आहे.

दगडाला ही देव मानून श्रध्दा ठेवणारी आपली भोळी भाबडी माणस प्रेमाची सहवासाची गोडी असणारी माणसं माझे पेशंट आहेत आणि आपलेही ( डॉक्टर बंधूंचे ) एक दिलेली गोळी जेवढं काम करणार नाही त्याहीपेक्षा त्याचा आपल्यावर असलेला विश्वास त्याला बरं करत असतो.डॉक्टरनी त्यांचे familiar’s बनून वेगळे नात निर्माण करायला पाहिजे, वेळ लागेल, थोडं अर्थशास्त्र कोलमडेल पण ते एक भांडवल असेल.सेवा मैत्री ओळख कधीच वाया जात नसते ती एक चांगुलपणा च्या बँकेत ठेवलंली ठेव तुमच्या आत्ताच्या भाषेत (diposit) दुप्पट cash होईल अगदी व्याजासहित.

आपल्याकडे येणाऱ्या पेशंटचां मित्र बनून पाहा त्याचा अन् तुमचाही फायदा काय होतो ते! तुम्ही अगदी B12 च injection दिलं तरी त्याची पोटदुखी थांबेल.ही ना जादू ना चमत्कार हा विश्वास तो विकत मिळत नाही कुठल्या बुकात शिकवत नाहीत.तो मिळवावा लागतो त्याला खर्च लागत नाही पण वेळ खर्च होतो.वर्ष, दोन वर्ष,बारा वर्षही लागतील पण that’s your investment & It’s a life time it’s true.

डॉक्टर साहेब फक्त तुम्ही हात लावा पेशंट बरा होईल हो म्हणत अजूनही खेड्यातले पेशंट माझ्याकडे येतात.कधी कुणाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये admit केल तरी डॉक्टर तुम्ही असला तर मी opretion करून घेईल म्हणणाऱ्या माता बहिणी मुली भाऊ मी अनुभवलेत.काही मिळवण्यासाठी काही गमवाव लागत. मी वेळ वर्षे गमावली पण असे स्नेही मित्र पेशंट च्या रूपाने माझ्या आयुष्याच्या बँकेत diposit झाले.

उगाच म्हणत नाहीत रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा.मंदिरात देव शोधत हिंडणारी अनेक जण पाहिली पण मी माणसामधला ईश्वर मिळवला. वारीत दमून आलेला वारकरी मला विठ्ठल दिसला त्याला पाणी देणारा विठ्ठल दिसला त्याला औषध देणाराही विठ्ठल त्याच पोट भरणारा ही पांडुरंग.

खेड्यातल्या माणसाचे साधे पायाचे ड्रेसिंग करताना कुणाला पाहा ते सगळ झालं की तुमच्या पायाला हात लाऊन पाया पडतो हा संस्कार आहे की अन्य काही कुणास ठाऊक पण अश्या माणसात नक्कीच परमेश्वर असतोच दिसतोच.

परवा एक पेशंट आला.मी चार दिवस पुण्यात असल्यानं दुखणं अंगावर काढले थोडा ताप कणकण म्हणुया.पेशंटला विचारले की,काय किमान गोळी तर घ्यायची तापाची.
ती म्हणाली नाय बा तुमच्या गोळीत जी पावर हाय ती तिच्यात कुठ.
मी म्हणालो अग मी याच दुकानातून घेवून तुला देत असतो. मग तिचे बोल आतड्याला भिडले ती म्हणाली,साहेब ती गोळी तुमचा गुण गोडवा कसा दिल ?

म्हणजे गुण औषधात कधी कधी नसतो तर त्यात आपल्यावर असलेल्या पावर् ची जादू अशी असते का ? खर तर अडाणी अशिक्षित असणे फायद्याचं असतं असा माझा अनुभव आहे .

त्यांच्या जवळचं सगळंच ते डॉक्टर समोर ठेवत असतात भाबडे.त्यांना माहिती असतं काहीही झालं तरी डॉक्टर आपल्याला बरं करणार.कोरोना वेळी अशा बोल उपचाराने अनेक बरे होताना मी अनुभवले.

अरे भिऊ नको मी आहे ना ? इतकंच वाक्य पेशंटचा आधार बनून आजार बर करत असतो.देव पाहणं, देव मिळवणे सोप आहे फक्त आपल्याला अवघड करून सांगितलं. चराचरातला देव तुकोबा पाहतात आपण त्यांच्या ओव्यांच पारायण करतो इतकं वाचूनही समजत नाही तरी आपण सुशिक्षीत ? असो हे अध्यात्म मी फक्त शिकलो नाही त्याच अनुकरण करत आलो. माझ्या मार्गात येणाऱ्या अनेकांना बरोबर घेऊन चाललो आहे.

अगदी पाच दशकांचा अनुभव घेताना अनेकांनी बरंच काही शिकवलं ते म्हणजे समर्पण केल्याशिवाय यश मिळत नाही आणि वैद्यकीय क्षेत्रातील यश म्हणजे मोठा दवाखाना, खूप पैसे असणं अस काही नाही. माझ्याकडे काही नाही तरी अजूनही माझा तुमच्या भाषेतला धंदा चालू आहे.कमाल नाही पण किमानवर समाधान आहे. व्यवसायाचा पेशा आणि पेशामधलीची लूट इथपर्यंत आपण आज पोहोचलो आहोत. कारण मूळ सेवाभाव विसरला जातो.अजूनही माझे मित्र सेवा करतात ते आज मोठे यशस्वी आहेत.नात असणं अन् निर्माण करण दोन वेगळे विरोधी विषय आहेत.किराणा,कपडा हा व्यवसाय व्यापार आहे पण डॉक्टरी ही सेवाचअसावी.अन् काय यश काय फक्त पैसे कमवून मिळते ?अन् मिळाले तरी ते अल्पजीवी असतं.अस काही तरी करा की आपली संपत्ती नको पण नाव मागे ठेवू जा याला चिरंतन यश मिळणे म्हणायचं.

डॉक्टर पेशा सेवा की कर्तव्य याचा विचार कधी केला नाही.जे चांगल ते आपलं जे बुद्धीला पटत नाही ते मागे सोडून मार्गक्रमण सुरू आहे.आमच्या डॉ मॅडम कायम म्हणतात,मेरा बेटा बडा हो के खटावकर डॉक्टर बनेगा.अशावेळी अजून ही सेवा करण्यासाठी मोठी ऊर्जा मिळत असते.

काल एका डॉक्टर मित्राने माझ्या आत्तापर्यंतच्या प्रॅक्टिसच गुपित विचारल त्याला हे समर्पित.

निवडलेले सगळे मार्ग हे शुभ असतात,सर्व क्षणही शुभ असतात फक्त आपले आचरण शुद्ध असायला हवे अन विचारही. शुभेच्छा डॉक्टर

डॉ श्रीकांत जगन्नाथ खटावकर,पंढरपूर.

Leave a Reply

Back To Top