नऊ ऑगस्ट क्रांती दिनापासून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार जिल्ह्याचा दौरा करणार
सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज- येत्या नऊ ऑगस्ट क्रांती दिनापासून काँग्रेस पक्षाचा सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यास प्रारंभ करत असून सोलापुरातील चार हुतात्मा पुतळ्यांना अभिवादन करून व पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन जिल्हा दौऱ्यास प्रारंभ करणार आहे अशी माहिती सोलापूर जिल्हा काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी काँग्रेस भवन सोलापूर मध्ये आयोजित केलेल्या तालुका, शहर, ब्लॉक अध्यक्ष यांच्या बैठकीमध्ये बोलताना दिली.

यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपाध्यक्ष अँड.अर्जुन पाटील,जिल्हा परिषद सदस्य अँड.संजय गायकवाड, उपाध्यक्ष अरुण जाधव,अक्कलकोट तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष हरीश पाटील आदी उपस्थित होते.
सातलिंग शटगार यांची सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तालुका अध्यक्षांची ही पहिली बैठक काँग्रेस भवनमध्ये संपन्न झाली. या बैठकीमध्ये सर्व तालुका,शहराध्यक्ष यांनी नूतन जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांचा सन्मान केला.
मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचाही सत्कार जिल्हाध्यक्ष श्री.शटगार यांच्या हस्ते करण्यात आला.

या बैठकीमध्ये जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यात आली व मतदार यादी पडताळणी कार्यक्रम हाती घेण्यात आला.बुथ कमिट्या सक्षम करण्यासाठी नियोजन ही करण्यात आले.१५ ऑगस्ट नंतर होणाऱ्या कार्यकर्ता प्रशिक्षणाचे नियोजनही या बैठकीत करण्यात आले.पक्ष संघटना बांधणी, जुन्या नवीन कार्यकर्त्यांचा मेळ घालून प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करीत असल्याचे श्री.शटगार यांनी सांगितले.
यावेळी तालुकाध्यक्षांनी आपल्या तालुक्यातील माहिती दिली.या बैठकीसाठी तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील,हरीश पाटील,प्रशांत साळे,सुलेमान तांबोळी,सतिश पाचकुडवे,भारत जाधव,संजय पाटील, शहर अध्यक्ष किशोर पवार,अमर सुर्यवंशी,फिरोज खान,मारुती वाकडे,सुभाष पाटील,उपाध्यक्ष अर्जुन पाटील,मोतीराम चव्हाण,सुरेश शिवपुजे,राजेश पवार ,अरुण जाधव, सिद्राम पवार, व्ही.जे.एन.टि विभागाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, सरचिटणीस प्रा.सिद्राम सलवदे, सुदर्शन आवताडे, दिलीप जाधव, सचिन गुंड, अँड.राहुल घुले,माजी नगराध्यक्षा डॉ.सुवर्णाताई मलगोंडा, रोहिणी गायकवाड, जहीर मनेर,सुनील सावंत,अँड.श्रीशैल रणखांबे, चन्नाप्पा लोणी,बिरा खरात, चिदानंद सुंटे,भिमराव बंडगर, गिरीश शेटे, बाळासाहेब मगर, ज्ञानेश्वर जन्मले आदी पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीचे सूत्रसंचालन अशोक कस्तुरे यांनी केले. आभार मोतीराम चव्हाण यांनी मानले.


