मंगळवेढा उपसा सिंचन संदर्भात आमदार समाधान आवताडे यांची संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक

मंगळवेढा उपसा सिंचन संदर्भात आ समाधान आवताडे यांची संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा तालुक्यातील जलसिंचन निर्मितीसाठी अतिशय महत्वपूर्ण असणाऱ्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या प्रत्यक्षात कामास लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे आणि दुसऱ्या टप्याच्या टेंडर च्या संदर्भात तसेच तिसऱ्या टप्प्याच्या निधी तरतुदीबाबत अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी संबंधित अधिकारी वर्ग यांच्यासोबत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघांचे आमदार समाधान आवताडे यांनी जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली.

मागील अनेक वर्षे मंजूरी आणि निधीच्या प्रतीक्षेत असलेल्या उपसा सिंचन योजनेच्या मंजूरीसाठी आमदार समाधान आवताडे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून या योजनेसाठी मंजूरी आणली होती. त्यानंतर काही दिवसात तत्कालीन राज्याचे उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा दौऱ्यावर येऊन प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ केला होता. त्याचबरोबर या योजनेसाठी निविदा जाहीर होऊन आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध करण्यात आली होती.

मंगळवेढा तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी नवा टप्पा असणाऱ्या या महत्वाकांक्षी योजनेमुळे मंगळवेढा तालुक्या तील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणीपुरवठा होऊन शेती विकासाला मोठी गती मिळणार आहे.

Leave a Reply

Back To Top